पंकजा मुंडेंच्या खंद्या समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या खंद्या समर्थकाने राष्ट्रवादीत प्रवेश (Pankaja munde supporter enter in ncp) केला आहे.
बीड : भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या खंद्या समर्थकाने राष्ट्रवादीत प्रवेश (Pankaja munde supporter enter in ncp) केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष पद न दिल्यामुळे कल्याण आखाडे यांनी पकंजा मुंडेसह भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश (Pankaja munde supporter enter in ncp) केला. त्यामुळे बीड जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो, असं म्हटलं जात आहे.
कल्याण आखाडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपात 13 वर्ष काम केलं. मुंडेंच्या हयातीनंतर देखील पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना साथ दिली. त्यानंतर भाजपची सत्ता महारष्ट्रात आली. सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी आखाडे यांनी केली होती. यावर पंकजा मुंडें यांनी आश्वासनही दिले होते. मात्र पाच वर्षात त्यांनी आश्वासन पाळले नसल्याचा गंभीर आरोप करत कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
कल्याण आखाडे यांनी पंकजा मुंडे यांना महामंडळावर अध्यक्ष करा अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी याच मागणीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र पंकजा मुंडेंनी महामंडळावर घेतलं नसल्याने नाराज झालेले आखाडे थेट राष्ट्रवादीच्या आखाड्यात गेले आहेत.
बीडमधील संभाव्य रंगतदार लढती
बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी) केज – संगिता ठोंबरे (भाजप) VS नमिता मुंदडा (राष्ट्रवादी) आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) VS अद्याप उमेदवार ठरलेला नाही
2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार
गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) केज – संगिता ठोंबरे (भाजप) परळी – पंकजा मुंडे (भाजप)