Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, चंद्रकांत पाटलांकडून हकालपट्टी

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असलेले परभणीतील सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हकालपट्टी केली Parabhani BJP Officials suspended

फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश, चंद्रकांत पाटलांकडून हकालपट्टी
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 12:14 PM

परभणी : परभणी जिल्ह्यात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदावर असलेल्या भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्याने भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. विशेष म्हणजे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद बोराडे यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता. (Parabhani BJP Officials suspended)

परभणीतील सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सीएएला विरोध करणारा प्रस्ताव मांडणं दोघांना चांगलंच महागात पडलं.

भाजपाची सत्ता असलेल्या नगरपालिकेत सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात ठराव संमत करण्यात आला होता. तसंच तो ठराव केंद्रालाही पाठवण्यात आला. पक्षशिस्त मोडल्यामुळे बोराडे आणि रोकडे यांना पक्षातून निष्कासित करण्यात असल्याचं पत्र जारी करण्यात आलं. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली.

पत्रात काय लिहिलं आहे?

‘पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे. या कायद्याच्या विरोधात आपण नगर परिषदेत प्रस्ताव आणून त्याचे समर्थन करुन पक्षविरोधी कृत्य केले आहे. ही कृती अनुशासन भंग करणारी असून पार्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. आपण पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आपणास पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे.’ अशा पत्राखाली भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची स्वाक्षरी आहे.

एकीकडे सीएए आणि एनआरसीवरुन वातावरण तापलेलं असताना भाजपच्या ताब्यातल्या नगरपालिकेने असा ठराव मंजूर केला. त्यामुळे या निर्णयाची चर्चा जिल्हाभर रंगली होती. 28 पैकी 26 नगरसेवकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनिष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं आणि स्वाक्षरी केली नाही. महत्त्वाचं म्हणजे हा ठराव घेतल्याचं अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं.

विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या अठरा नगरसेवकांसह मेघना बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बोर्डीकरांचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद बोराडे यांनी हा प्रस्ताव मांडल्याने आता त्याही अडचणीत येण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

(Parabhani BJP Officials suspended)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.