प्रकाश मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांचा राडा, पराग शाहांची गाडी फोडली

घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शाहांची गाडी फोडून आपला राग व्यक्त केला आहे. यावेळी पराग शाह गाडीतच बसलेले होते.

प्रकाश मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांचा राडा, पराग शाहांची गाडी फोडली
Follow us
| Updated on: Oct 04, 2019 | 11:54 AM

मुंबई : प्रकाश मेहता यांच्या जागी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड (Parag Shah Car Destroyed) करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांना पराग शाहांची गाडी फोडली. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला.

घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शाहांची गाडी फोडून (Parag Shah Car Destroyed) आपला राग व्यक्त केला. यावेळी पराग शाह गाडीतच बसलेले होते. आपण सुरक्षित असल्याची माहिती पराग शाह यांनी ‘टीव्ही9 मराठी’ ला दिली. कार्यकर्त्यांची समजूत घालणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली.

आपण पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करणार नसल्याचं पराग शाह यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांचा राग समजू शकतो, मात्र प्रकाश मेहता आपल्या पाठीशी आहेत. त्यांची नाराजी नाही. ते आपल्याला पाठिंबा देणार आहेत. मेहता कार्यकर्त्यांचं मन वळवतील, असाही विश्वास शाहांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

अमित शाहांना जरुर विचारणार, मला तिकीट का नाही? : विनोद तावडे

घाटकोपरमध्ये झालेल्या राड्यामुळे मुंबई भाजपमधील पक्षांतर्गत धुसफूस यामुळे समोर आली आहे. प्रकाश मेहतांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र पराग शाह उमेदवारी अर्ज भरणार असल्याने मेहता समर्थकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

मेहता समर्थकांकडून पराग शाहांच्या गाडीची तोडफोड, पाहा व्हिडीओ

भाजपने आतापर्यंत 17 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या घोषित करत भाजपने 150 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे, तिकीट कापल्यानंतर उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पक्ष जो काय आहे तो विचार करेल. निवडणुकीच्या काळात कोण चूक कोण बरोबर याचा विचार करण्याची ही वेळ नाही, असं विनोद तावडे (Vinod Tawde BJP) म्हणाले.  भाजपने विनोद तावडे यांच्या ऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे.

एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर अद्याप दुसरा उमेदवार दिला नसल्यामुळे त्यांना अंधुकशी आशा कायम आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.