Parambir Singh: हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप

मसुख हिरेन प्रकरण आणि अँटालिया प्रकरणाचा मास्टर माइंड दुसरे तिसरे कुणी नसून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच आहेत. मात्र, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जात आहेत.

Parambir Singh: हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप
हिरेन प्रकरणाचा मास्टरमाइंड परमबीर सिंगच, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जाताहेत; सतेज पाटील यांचा आरोप
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 12:57 PM

पणजी: मसुख हिरेन (mansukh hiren) प्रकरण आणि अँटालिया प्रकरणाचा मास्टर माइंड दुसरे तिसरे कुणी नसून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच (parambir singh) आहेत. मात्र, काही बातम्या सिस्टिमॅटिकली पेरल्या जात आहेत. हे सर्व सुनियोजितपणे सुरू आहे. त्यावर ईडीनेच खुलासा केला पाहिजे. या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे ईडीनेच सांगितलं पाहिजे. त्यांनीच पुढे येऊन बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil)  यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा माझ्यावर दबाव होता. त्यामुळेच मी वाझेला सेवेत घेतलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी ईडीसमोर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

सतेज पाटील हे गोव्यात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अँटालिया प्रकरमात कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल. तेव्हाच सत्यबाहेर येईल. तरच महाराष्ट्रातील जनतेला सत्य समजेल. सत्य बाजू कोणती आहे हे त्या प्रतिज्ञापत्रातूनच दिसून येईल. वाझेच्या प्रतिनियुक्तीबाबतच्या बातम्या पेरल्या जात आहे. सिस्टिमॅटिकली या बातम्या लिकेज केल्या जात आहेत. हे काही बरोबर नाही. या बातम्या कोण लिक करत आहे? त्यात काही तथ्य आहे का? यावर ईडीनेच खुलासा केला पाहिजे, असंही सतेज पाटील म्हणाले.

परब यांनी यादी दिल्याच्या आरोपात तथ्य नाही

ईडीसारख्या संस्थांकडून या बातम्या लिक होत असतील तर ते योग्य नाही. तपासाच्या दृष्टीने या गोष्टी योग्य नाहीत. तपास सुरू असताना चुकीच्या बातम्या बाहेर पडणं योग्य नाही. त्यामुळे आता ईडीने समोर येऊन बोललं पाहिजे. महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. ज्यावेळी सत्यबाहेर येली तेव्हा सर्व आरोप खोटे आहे हे कळेल. कोणत्याही नियुक्त्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रोसेसनुसारच होतं असतात. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतरच पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या होत असतात. त्यामुळे अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनऑफिशियल यादी दिली यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा अजेंडा

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा एकच अजेंडा भाजपचा आहे. भाजपने 171 आमदारांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. भाजपने पाच वर्ष विरोधी पक्षात राहावे. विनाकारण अडवं पडण्यात काहीच अर्थ नाही. राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

औरंगाबादेत घरकुल योजनेचं राजकारण पेटलं, खा. इम्तियाज जलील यांच्यानंतर आता भाजप आक्रमक, पालकमंत्र्यांना घेराव घालणार

मुंबईत भाजप आणि काँग्रेस आमने सामने, पेगाससच्या मुद्यावरुन काँग्रेसचं आंदोलन, भाजप नेत्यांचा ठिय्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.