Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parambir Singh Letter : दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका, राऊत, पटेल, अजितदादा आणि जयंत पाटलांचीही हजेरी!

भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजनाधी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकाचं सत्र सुरु आहे.

Parambir Singh Letter : दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका, राऊत, पटेल, अजितदादा आणि जयंत पाटलांचीही हजेरी!
sharad pawar
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 6:42 PM

नवी दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तपदावर उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजनाधी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकाचं सत्र सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही नुकतीच पवारांची भेट घेतली आहे.(important meeting at the residence of Sharad Pawar in Delhi regarding the resignation of Anil Deshmukh)

राऊतांची पवारांशी चर्चा

दिल्लीतील पवारांचं निवासस्थान असलेल्या 6 जनपथवर शिवसेना खासदार संजय राऊत संध्याकाळी पोहोचले. त्यांनी पवारांसोबत साधारण 15 मिनिटे चर्चा केली. त्यावेळी राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा केल्याचं कळतंय. पवारांच्या भेटीसाठी जात असताना या प्रकरणावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. पवारांची भेट आटोपून राऊत निघाले त्यावेळीही त्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगलं. राऊत यांची गाडी पवारांच्या निवासस्थानावरुन रवाना होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनीही माध्यमांशी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार, जयंत पाटील दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्र्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सिंग यांनी केलेल्या आरोपांची उच्चस्तरिय चौकशीची मागणी होत आहे. तसंच अनिल देशमुख यांचा राजीनामाही मागितला जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गृहमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येतंय.

काँग्रेस नेते कमलनाथ यांचीही हजेरी

शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. अशावेळी काँग्रेसचीही मोठी बदनामी होत आहे. अशावेळी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कमलनाथ यांनी पवारांच्या निवासस्थानही होत असलेल्या बैठकीला हजेरी लावल्याचं बोललं जात आहे.

अनिल देशमुखाबाबत 2 दिवसांत निर्णय?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल. देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. तसंच अन्य नेत्यांशी बोलून देशमुखांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता देशमुख गृहमंत्रीपदावर कायम राहणार की त्यांची उचलबांगडी केली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

important meeting at the residence of Sharad Pawar in Delhi regarding the resignation of Anil Deshmukh

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.