मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी एक ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे. सिंग यांच्या या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होत आहे. अशावेळी आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार केलाय. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठीच भाजपनं हे कुभांड रचल्याचा आरोप त्यांनी केलाय.(Sachin Sawant criticizes BJP after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh)
“महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटेलीया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही. जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन देलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वबचावाकरिता दिसत आहेत”, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटेलीया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 20, 2021
“अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपाने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजपा नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होते. जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती देलकर प्रकरणात का नाही? देलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? देलकर प्रकरणात भाजपाचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत आहे”, असा गंभीर आरोपही सावंत यांनी केलाय.
“पोलीस आयुक्त परमबीर सिंग अचानक गृहमंत्र्यांवर जे खोटे आरोप करायला लागलेत यावरून भाजपाने केंद्रीय यंत्रणेचा यावेळीही गैरवापर करून दडपशाही मार्गाने सिंगाना पत्रव्यवहार करायला भाग पाडलय . भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे महाराष्ट्राला माहित आहे. सावधान”, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर केलाय.
“मागच्या काळात माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंग यांनी प्रामाणिकपणे कबुली द्यावी. तरच ते प्रामाणिक आहेत हे सिद्ध होईल. अन्यथा अचानक झालेला साक्षात्कार दिल्लीश्वराच्या आदेशावरून आहे यात कुणाला शंका नसेल”, अशी टीकाही मिटकरी यांनी केली आहे.
Parambir Singh Letter : “अब तो स्पष्ट है, यह सरकार भ्रष्ट है!” परमबीर सिंगांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर भाजप नेत्यांचा हल्लाबोल https://t.co/MZUfMkkcK7 @BJP4Maharashtra @ChDadaPatil @ShelarAshish @BhatkhalkarA @mipravindarekar @KiritSomaiya #BJP #AnilDeshmukh #SachinVaze #ParambirSingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा, अनिल देशमुखांची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करा : राज ठाकरे कडाडले
Sachin Sawant criticizes BJP after Parambir Singh’s allegations against Anil Deshmukh