मुंबई : पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप सिंग यांनी आपल्या पत्रात केलाय. अशावेळी आता परमबीर सिंग यांचा भाजपसोबत थेट संबंध असल्याचं आता सांगण्यात येत आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.(Parambir Singh is said to be a relative of BJP leader Sagar Meghe)
परमबीर सिंग आणि भाजप नेते सागर मेघे हे व्याही आहेत. सिंग यांचा मुलगा रोहनचं लग्न भाजप नेते सागर मेघे यांची कन्या राधिकाशी झालं आहे. सागर मेघे हे दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत. काँग्रेसवासी असलेल्या दत्ता मेघे यांच्या कुटुंबानं 2014 मध्ये भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सागर मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
Some ppl targeting Mumbai Police shud knw that Parambir Singh’s son Rohan Singh is married to Nagpur businessman & BJP politician Sagar Meghe’s daughter Radhika.Sagar is son of veteran BJP leader Datta Meghe & brother of BJP MLA Sameer Meghe.#SushantCoverUp #WeTrustMumbaiPolice pic.twitter.com/pnH2ieSfM7
— Rohan (@wordsmith_rj) August 3, 2020
परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन आणि सागर मेघे यांची कन्या राधिका यांचा विवाह 2017 मध्ये बंगळुरु इथं पार पडला होता. तेव्हा परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्तपदावर कार्यरत होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
दत्ता मेघे हे 2014 पूर्वी काँग्रेसचे नेते होते. ते काँग्रेसमधून तब्बल 4 वेळा खासदार राहिले आहेत. 10 व्या लोकसभेत त्यांनी नागपूरमधून विजय मिळवला होता. त्यानंतर ते रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातूनही खासदार राहिले आहेत. दत्ता मेघे हे काँग्रेसचे नेते जरी राहिलेले असले तरी त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चांगले संबंध राहिले आहेत. ते पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. मात्र 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिलं आहे. हे एकूण 8 पानी पत्र आहे. त्यात 23 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. त्याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलंय. तसंच अन्य अनेक गंभीर आरोप सिंग यांनी या पत्रात केले आहेत.
संबंधित बातम्या :
गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल
Parambir Singh is said to be a relative of BJP leader Sagar Meghe