परभणीत आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न 50 वर्षांपासून प्रलंबित, गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असल्याने आता या गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे
परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असल्याने आता या गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे (Parbhani Villagers Boycott Elections). गेल्या 50 वर्षांपासून या समस्येवर प्रशासनाकडून कुठलीच उपाययोजना न झाल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या २६ सप्टेंबरला थडी उक्कडगाव येथे गोदाकाठच्या आठ गावांनी महापंचायतीचे आयोजन करुन रस्ता प्रश्नावरुन मतदानावर बहिष्कार करत राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचाऱ्य़ांना गावबंदी जाहीर केली होती (Parbhani Villagers Boycott Elections).
यानंतर प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी गावकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी चौकशीही न केल्याने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे (Parbhani Villagers Boycott Elections). शिवाय, एकाही राजकीय पदाधिकाऱ्याने सुध्दा या गावांना भेट देणं टाळलं.
या गावातील तरुणांनी प्रत्येक गावात सभा, बैठका घेऊन रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याचा निर्धार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थडी उक्कडगाव येथे या आठ गावातील नागरीकांनी एक बैठक घेऊन रस्त्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार कायम ठेऊन प्रशासनाशी असहकार करण्याचे ठरवले आहे.
लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावातील मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. मतदानासाठी संपू्र्ण राज्यात सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरातील 288 विधानसभा जागांवर मतदान पार पडेल.
संबंधित बातम्या :
पावसामुळे निवडणूक कर्मचारी हैरान, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत
निवडणुकीसाठी एसटीच्या 10 हजार 500 बसेस आरक्षित, वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता