‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’, सुषमा अंधारे कडाडल्या, ‘त्या’ प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न

"देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा", अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

'देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', सुषमा अंधारे कडाडल्या, 'त्या' प्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 11:34 PM

परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत पोहोचली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता या गोष्टीची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस धमकी प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे खुर्चीला चिटकून बसले आहेत. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. फडणवीस देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. “माझी फडणवीस यांच्यासोबत दुश्मनी नाही. सत्तेचा लोभ त्यांनी बाजूला ठेवावा”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“अमृता फडणवीस प्रकरणात सखोल निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता फडणवीस यांच्या पत्नीची चौकशी सुरु आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही मी पुन्हा येईल पुन्हा येईल असा आक्रस्तळंपणा करणार नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘मी लढेन आणि मीच जिंकेन’

“दोन-चार कॅबिनेट मंत्री माझ्यावर बोलतात. इतकं झालं तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प आहेत. मी चळवळीचे शास्त्र शिकले आहे. कितीही टीका झाली, चारित्र्यहनन केले तरी मी भीक घालणार नाही. मी लढेन आणि मीच जिंकेन”, असा विश्वास अंधारे व्यक्त केला. “मला डॅमेज आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा दावा त्यांनी केला.

“पोलिसांना हप्ते नावाची गोष्ट कळते राज्यात वचक राहिला नही. मला उसकावण्याचा प्रयत्न केले जात आहेत, मी काही चुकेल का? कुठे अडकेल का हे पहिले जात आहे. मी कायद्याचं संविधानचं बोलतेय. उगाच टीका करीत नही, मूळ मुद्यावर चर्चा करीत नाहीत. त्यानी संभाजी नगर येथे सावरकर गौरव यात्रा काढली त्यांना 83 लोक शिल्लक होते”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर आपल्या भाषणात भूमिका मांडली. “वज्रमूठ सभेनंतर संभाजीनगर येथे गोमूत्र शिंपडले. तुम्ही मुस्लिम, बुद्ध, इतर 18 पगड जातीचा समाजाचा अपमान करताय. या अपमानाचा बदला घ्यायचा. आमच्या स्पर्शाचा विटाळ होतो. गोमूत्र शिंपडणारी ही नवनीत राणा प्रवृत्ती आहे ते तुम्हाला माणूस नव्हे तर जनावर समजतात”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.