Parth Pawar : पार्थ पवारांसाठी पंढरपूर मतदारसंघाचं गणित कसं असेल?
माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पंढरपूरचा रखडलेला विकास साधायचा असेल तर पार्थ पवार यांना उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे.
पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार दिला जाणार की दुसरा उमेदवार असेल? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव समोर आलं आहे. (How will Pandharpur Assembly constituency be for Parth Pawar?)
माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पंढरपूरचा रखडलेला विकास साधायचा असेल तर पार्थ पवार यांना उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. तसं पत्रच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. असं असलं तरी पंढरपुरातील तरुण मंडळींमध्ये मात्र पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत विरोध असल्याचं सांगितलं जात आहे.
आयात उमेदवाराच्या पराभवाचा इतिहास!
पंढरपूरची जनता स्थानिक उमेदवाराच्याच पाठिशी उभी राहते. बाहेरचा उमेदवार दिल्यास त्याला पराभवाला समोरं जावं लागतं, हा पंढरपूर मतदारसंघाचा इतिहास आहे. यापूर्वी तत्कालीन राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण मोहिते-पाटील यांना मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. मोहिते-पाटलांचा पराभव केल्यानंतर भालके यांना जायंट किलर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर
भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी होऊ लागली होती. पण त्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. भारत भालके यांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असेल तर स्वागत आहे. पण निवडणूक लागणार असेल, तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आपणही इच्छुक असल्याचं गोडसे यांनी जाहीर केलं आहे.
दुसरीकडे भाजपकडून या मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर आहे. तर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत या दोघांचा विचार घेतला जाऊ शकतो.
पार्थच्या उमेदवारीची जोरदार चर्चा, जयंत पाटील म्हणतात…https://t.co/ven6xk4Grv@parthajitpawar @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020
संबंधित बातम्या:
Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?
‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’
How will Pandharpur Assembly constituency be for Parth Pawar?