पार्थ पवार यांच्या आणखी एका भाषणाची चर्चा

रायगड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचं आणखी एक भाषण चर्चेत आलं आहे. पार्थ पवार हे पिंपरीतील अडखळत्या भाषणामुळे ट्रोल झाले होते. मात्र त्यांनी शुक्रवारी रायगडमध्ये केलेलं भाषण वाहवा मिळवणारं ठरलं. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी इथं राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली, यावेळी पार्थ पवार यांनी कसलेल्या नेत्याप्रमाणे भाषण केलं. पार्थ पवार यांनी […]

पार्थ पवार यांच्या आणखी एका भाषणाची चर्चा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

रायगड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचं आणखी एक भाषण चर्चेत आलं आहे. पार्थ पवार हे पिंपरीतील अडखळत्या भाषणामुळे ट्रोल झाले होते. मात्र त्यांनी शुक्रवारी रायगडमध्ये केलेलं भाषण वाहवा मिळवणारं ठरलं. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी इथं राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली, यावेळी पार्थ पवार यांनी कसलेल्या नेत्याप्रमाणे भाषण केलं.

पार्थ पवार यांनी आपल्या भाषणात मध्ये मध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला. पण त्यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले.

‘ते घाबरलेत

“जेव्हापासून माझं नाव आलं आहे, तेव्हापासून ते लोक घाबरले आहेत. लोक माझ्यावरती टिका करतात, मला समजत नाही का? साहेबांवर टीका करतात. पण तुम्ही मावळबद्दल बोला, तुम्ही इथे काय केलं, मावळच्या विकासावर बोला, पण तसं काय तुम्हाला बोलायचं नाही”, असं पार्थ पवार म्हणाले.

त्यांना माहीत आहे, जर हे आले तर त्यांना इथून हलवण्यास खूप वर्ष लागतील, हे विरोधकांना माहित असल्याने ते राष्ट्रवादीला घाबरत आहेत, असं पार्थ पवारांनी नमूद केलं.

वाचा – पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे

दरम्यान, वेळेचं बंधन पाळण्यासाठी पार्थ पवार ऑनलाईन वेळ दाखवणारं घड्याळ वापरत असल्याचं सांगितलं.

कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी 10 वाजत आल्याची आठवण करुन देताच, पार्थ यांनीही पाच मिनिटे शिल्लक आहेत वेळेवर भाषण संपवतो, माझ्याकडे ऑनलाईन घड्याळ आहे, असं सांगत आणखी चार मिनिटे भाषण करुन थांबवलं.

मावळ मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. दोघांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उदयनराजे मैदानात

मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जाहीर सभा घेणार आहेत.

उद्या म्हणजे 13 एप्रिल रोजी पुण्यातील निगडी येथे उदयनराजे भोसले यांची सभा होणार आहे. महापौर निवास मैदानात सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या  

मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचं पहिलं जाहीर भाषण

पार्थ पवार आणि अमोल कोल्हेंसाठी उदयनराजे मैदानात  

पवार काका-पुतण्यांची मावळ आणि बारामतीतच दमछाक? राज्यातील उमेदवार वाऱ्यावर  

छोट्या भावाकडून 2 कोटी घेतले, आत्या-आजोबांना 70 लाख दिले, पार्थची संपत्ती किती?  

मावळ : कसा असतो पार्थ पवार यांचा प्रचार?  

अडखळलेल्या भाषणाबद्दल पार्थ पवार म्हणतात…. 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.