पहिलं भाषण, उलट्या ट्रेनने प्रवास आणि धर्मगुरुचा आशीर्वाद, पार्थ पवार पुन्हा ट्रोल
पुणे : राष्ट्रवादीने पवार घराण्याची तिसरी पिढी पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारि दिली आहे. पण पार्थ पवार त्यांच्या प्रचाराच्या जगावेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत आहेत. पहिलं भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचं सांगणं यावरुन पार्थ पवार अगोदरच ट्रोल झालेत. यावेळी दापोडीतील विनियार्ड चर्चर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री […]
पुणे : राष्ट्रवादीने पवार घराण्याची तिसरी पिढी पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारि दिली आहे. पण पार्थ पवार त्यांच्या प्रचाराच्या जगावेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत आहेत. पहिलं भाषण, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचं सांगणं यावरुन पार्थ पवार अगोदरच ट्रोल झालेत. यावेळी दापोडीतील विनियार्ड चर्चर्चे वादग्रस्त फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे आणि जयश्री सिल्व्हवे यांची भेट घेतल्याने पुन्हा पार्थ ट्रोल होऊ लागले आहेत. दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते.
‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वाद पार्थ पवारांना मिळाल्याची माहिती आहे. असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा फादर पास्टर डेव्हिड सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते. हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यर्त्यांनी त्यांच्यावर हल्लाही केला होता. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या धर्मगुरुची भेट घेतल्याने पार्थ पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.
दरबारातला व्हिडीओ :
VIDEO : पार्थ पवार आशीर्वाद घेण्यासाठी वादग्रस्त धर्मगुरुच्या दरबारी, सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल pic.twitter.com/fmETSPOt96
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2019