महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांची युती निश्चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 11 एप्रिलपासून देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडासाफ केला होता. यावेळी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा […]

महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांची युती निश्चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 11 एप्रिलपासून देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडासाफ केला होता. यावेळी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

2014 मध्ये भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीच्या चार आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या, तर स्वाभिमानीने 1 जागा जिंकली होती.  पण भाजपमध्ये असलेले नाना पटोले यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला ही जागा गमवावी लागली. त्यामुळे 2014 च्या तुलनेत सध्या भाजपकडे एक जागा कमी, तर राष्ट्रवादीकडे एक जागा जास्त आहे. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यानंतर तिथेही पोटनिवडणूक झाली. पण या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता.

सध्या कोणती जागा कोणत्या पक्षाकडे?

हिंगोली – राजीव सातव, काँग्रेस

नांदेड – अशोक चव्हाण, काँग्रेस

परभणी – संजय जाधव, शिवसेना

जालना – रावसाहेब दानवे, भाजप

औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, शिवसेना

बीड – प्रितम मुंडे, भाजप

उस्मानाबाद – रवींद्र गायकवाड, शिवसेना

लातूर – डॉ. सुनिल गायकवाड, भाजप

बुलडाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना

अकोला – संजय धोत्रे, भाजप

अमरावती – आनंदराव अडसूळ, शिवसेना

वर्धा – रामदास तडस, भाजप

रामटेक – कृपाल तुमाने, शिवसेना

नागपूर – नितीन गडकरी, भाजप

भंडारा-गोंदिया – मधुकर कुकडे, राष्ट्रवादी

गडचिरोली-चिमूर – अशोक नेते, भाजप

चंद्रपूर –  हंसराज अहीर, भाजप

यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, शिवसेना

पालघर – राजेंद्र गावित, भाजप

भिवंडी – कपिल पाटील, भाजप

कल्याण – श्रीकांत शिंदे, शिवसेना

ठाणे – राजन विचारे, शिवसेना

Mumbai North – गोपाल शेट्टी, भाजप

Mumbai North West – गजानन कीर्तीकर, शिवसेना

Mumbai North East – किरीट सोमय्या, भाजप

Mumbai North Central – पूनम महाजन, भाजप

Mumbai South Central – राहुल शेवाळे, शिवसेना

Mumbai South – अरविंद सावंत, शिवसेना

रायगड – अनंत गीते, शिवसेना

मावळ – श्रीरंग बारणे, शिवसेना

पुणे – अनिल शिरोळे, भाजप

बारामती – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

शिरुर – शिवाजीराव अढळराव पाटील, शिवसेना

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत, शिवसेना

अहमदनगर – दिलीप गांधी, भाजप

शिर्डी – सदाशिव लोखंडे, शिवसेना

सोलापूर – शरद बनसोडे, भाजप

माढा – विजय सिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

सांगली – संजय काका पाटील, भाजप

सातारा – उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस

कोल्हापूर – धनंजय महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेस

हातकणंगले – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना (2014 ला महायुतीचे उमेदवार)

नंदुरबार – हीना गावित, भाजप

धुळे – सुभाष भामरे, भाजप

जळगाव – ए. टी. पाटील, भाजप

रावेर – रक्षा खडसे, भाजप

दिंडोरी – हरीश्चंद्र चव्हाण, भाजप

नाशिक – हेमंत गोडसे, शिवसेना

48 मतदारसंघातील सध्याचं चित्र

भाजप – 22

शिवसेना – 18

राष्ट्रवादी – 05

काँग्रेस – 02

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 01

(तुमच्या मतदारसंघातली सध्याची समीकरणं पाहण्यासाठी क्लिक https://www.tv9marathi.com/lok-sabha-election-2019 करा)

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.