PCMC Election 2022 : पिंपरी-चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी, वॉर्ड क्र 28 मधील काट्याची टक्कर तशीच राहणार? यावेळची गणितं काय?
गेल्यावेळी भाजपने अटीतटीची लढत देत ही महानगरपालिका आपल्या ताब्यात आणली तर राष्ट्रवादीने ही भाजपला तसेच कडवी झुंज दिली काँग्रेसने ही बराच जोर लावला होता.
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला (PCMC Election 2022) आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पाहिलं जातं. ही महानगरपालिका आपल्या ताब्यात असावी असे सर्वच राजकीय पक्षांना वाटतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात असणं म्हणजे विधानसभा निवडणुकीला याचा मोठा फरक पडतो. गेल्यावेळी भाजपने (BJP) अटीतटीची लढत देत ही महानगरपालिका आपल्या ताब्यात आणली तर राष्ट्रवादीने ही भाजपला तसेच कडवी झुंज दिली काँग्रेसने ही बराच जोर लावला होता. मनसेला मात्र फार काही हाती लागलं नव्हतं. मात्र या वेळेचे समीकरणे जरा वेगळी आहेत. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पेशल पिंपरी चिंचवडकडे लक्ष दिला आहे. त्यामुळे अजित पवारांचे मनसे मनसुबे यशस्वी होणार की भाजप पुन्हा गड राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मागच्या वेळी कुणाची बाजी?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 28 चं गणित गेल्या वेळेस काहीसं संमिश्र राहिलंय यात निर्णयाकपणे वार्ड कुणाच्या बाजूने फिरला हे अंदाज कुणालाच लावता येत नव्हते. कारण भाजपकडून या वार्डमधून पहिले उमेदवार बापू सीताराम काटे विजयी झाले. त्यांनी तब्बल 14,138 मते घेतली. तर भाजपकडूनच या वार्ड मधून दुसऱ्या उमेदवार निर्मला संजय कुटे या विजय झाल्या. त्यांनी आठ हजार 830 मत घेतली. तिसरा उमेदवार मात्र या वॉर्डमधून राष्ट्रवादीचा निवडून आला. शितल काटे यांनी 12462 मतं घेतली. तर चौथा उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादीचाच निवडून आला राष्ट्रवादीच्या काटे यांनी 12 हजाराच्या पेक्षा जास्त मतं घेतली. त्यामुळे हा वार्ड राष्ट्रवादी आणि भाजपच्या काट्याच्या लढतीत राहिल्यासारखा राहिला.
आकडेवारी याठिकाणी पाहा
भाजप | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
काँग्रेस | ||||
राष्ट्रवादी | ||||
मनसे |
कशा आहेत वॉर्डच्या सीमा?
यावेळी वॉर्ड पुनरर्चना झाल्यामुळे या सीमांमध्ये बदलही होऊ शकतात, मात्र मागच्या वेळीप्रमाणे, केशवनगर, मोरया राज पार्क, लक्ष्मी नगर, यशोपुरम, श्रीधरनगर इ. रेल्वे लाईन, अशी या वॉर्डची व्यप्ती आहे. मदर टेरेसा फ्लाय ओव्हर रेल्वे लाईनपासून दक्षिणेस काळेवाडी रस्त्याने पवना नदी पर्यंत. पवना नदी चित्तराव गणपती मंदिरापासून उत्तरेस चिंचवड काळेवाडी रस्त्याने शहीद अशोक कामठे चिंचवड पी. एम. पी. एम. एल. बस स्टॉप चौकापर्यंत व तेथून चिंचवड पिंपरी लिंकरोडने (स्वा. सावरकर मार्ग) पुर्वेस कालीकामाता मंदिर व प्रदीप स्वीटस पर्यंत व तेथून उत्तरेस मेट्रोपोलिटन हौ. सोसा. पर्यंत जातो.
भाजप | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
काँग्रेस | ||||
राष्ट्रवादी | ||||
मनसे |
तसेच मेट्रोपोलिटन हौ. सोसायटी लगतच्या रस्त्याने पुर्वेकडे चिंचवड पिंपरी लिंक रस्त्यापर्यंत व त्याच लगतच्या रस्त्याने पुर्वेकडे चिंचवड नाल्यापर्यंत व नाल्याने दक्षिणेकडे कृष्णा स्विटस मागील बाजुने चिंचवड पिंपरी लिंक रस्त्याने स्वामी विवेकानंद चौक व दुर्गा कॉर्नर पर्यंत व चौकापासून उत्तरेस सुखवाणी व्हिला लगतच्या रस्त्याने पश्चिमेस धोका कॉलनी व जीवननगर लगतच्या रस्त्याने रामकृष्ण मोरे सभागृहापर्यंत व त्याच रस्त्याने उत्तरेस चिंचवडस्टेशन चिंचवडगाव रस्त्याने चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल पूलापर्यंत व पूलापासून उत्तरेस संतोषनगर पर्यंत व तेथून पुर्वेस साईबाबानगर झोपडपट्टी रेल्वे लाईनपर्यंत, असा हा वॉर्ड आहे.
भाजप | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
काँग्रेस | ||||
राष्ट्रवादी | ||||
मनसे |