विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

लोकसभा निवडणुकीनंतर आता नागपूर विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायलयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. विदर्भातील निवडणुकीत दोषपूर्ण इव्हीएम वापरल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
Follow us
| Updated on: Jul 09, 2019 | 8:56 AM

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता नागपूर विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायलयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. विदर्भातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार नितीन गडकरी, अशोक नेते, रामदास तडस, सुनील मेंढे, शिवसेना खासदार कृपाल तुमाने, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर या खासदारांविरोधात याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण मतदान आणि मतमोजणीत फरक झाल्याचे दिसून येत आहे. या फरकाचा फायदा मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवारांना मिळाला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सहा खासदारांच्या निवडीला चक्क मुंबई उच्च न्यायलयात आव्हान देण्यात आलं आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. दरम्यान या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विजयी ठरले होते. दरम्यान गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी याचिका दाखल केली आहे.

तर रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होत आहे. यात शिवसेनेचे कृपाल तुमाणे यांचा विजय झाला होता. तर तुमाणे यांच्याविरोधात काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी याचिका दाखल केली आहे.

त्याशिवाय चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, काँग्रेसच्या बाळू धानोरकर, वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात लढत झाली होती. यात काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांचा विजय झाला होता. त्यामुळे धानोरकर यांच्याविरोधात वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी याचिका दाखल केली आहे.

त्याशिवाय गडचिरोली चिमूरमधून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं होतं. यात भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला होता. तर भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेढें तर आघाडीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात उतरले होते. यात भाजपच्या सुनील मेंढे यांचा विजय झाला होता.

वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस रिंगणात उतरले होते. यात विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. दरम्यान या मतदारसंघातून विजयी झालेल्या सर्व खासदारांवर याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायलय या याचिकांवर काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.