Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार, फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पाऊल मागे?

भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार, फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पाऊल मागे?
देवेंद्र फडणवीसांचा जबाब घरी नोंदवणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 5:20 PM

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मोठ्य वादात सापडले आहे. कारण फडणवीसांच्या काळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप (Pune police) केल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. या प्रकरणा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनना नोटीस बजावली आहे. फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना बोलावलं होतं. मात्र भाजपने दुसरीकडे आंदोलनची तयारी केली होती. त्यामुळे काय आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणा नवं ट्विट आलं आहे. राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा गाजत आहे.

कधीही या मी तयार आहे

nc src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″>

पोलीस सागर बंगल्यावर जाणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

कोणाचे फोन टॅप केले?

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. त्यात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणावरून ठाकरे सरकार फडणवीसांची चौकशी करणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून फोन टॅप करण्यात आले का, असा संशय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आहे. या चौकशीतून काय समोर येते, ते पाहावे लागेल.

Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका

धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक

आणि तरीही मी पोलीसांसमोर हजर होणार, फडणवीसांची घोषणा, मुंबईकरांचा रविवार उद्या राजकीयदृष्ट्या टाईट जाणार

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.