राऊतांचं ‘रहाटे’ तर खडसेंचं ‘खडसणे’! फोन टॅपिंगआधी देण्यात आलेल्या नावांबाबत सगळ्यात मोठा खुलासा

Rashmi Shukla Phone Tapping case: संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नाव वापरुन संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचे फोन टॅप केले गेले, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

राऊतांचं 'रहाटे' तर खडसेंचं 'खडसणे'! फोन टॅपिंगआधी देण्यात आलेल्या नावांबाबत सगळ्यात मोठा खुलासा
संजय राऊत, रश्मी शुक्ला, एकनाथ खडसेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 11:52 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Sanjay Raut & Eknath Khadse) यांचे फोन टॅपिंग (Phone Tapping) केल्याचा आरोप करण्यात आला. बेकायदेशीरपणे नावं बदलून राऊत आणि खडसेच्या फोनचं टॅपिंग (illegal Phone tapping of politians) करण्यात आल्याचा आरोप सातत्यानं शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेळोवेळी केलेला. त्यानंतर आता संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचं फोन टॅपिंग करण्याआधी त्यांना काय नावं देण्यात आली होती, याबाबतही खुलासा करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचा एस रहाटे असं नाव देण्यात आलं होतं. तर एकनाथ खडसे यांना खडसणे हे नाव देण्यात आलेलं. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नाव वापरुन संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचे फोन टॅप केले गेले, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या मुंबई पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी केली जाते आहे.

तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्यांचीही सध्या कसून चौकशी केली जाते आहे. दरम्यान, याच प्रकरणी पोलिसांनी इतर सहा मोठ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली आहे. हे सर्व अधिकारी एसीएस होम आणि डीव्हायएसपी दर्जाचे अधिकारी असल्याचीही माहिती समोर आली आहे. हे सर्व सहा जण त्यावेली एसआयडीमध्ये तैनात होते, असं सांगितलं जातंय. मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम 164 अंतर्गत 6 जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवलेत. या अधिकाऱ्यांच्या जबाबातून आता महत्त्वपूर्ण खुलासे होण्याचीही दाट शक्यता आहे.

संजय राऊतांचे आरोप काय?

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी आमचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आमचं खासगी बोलणं काय होतं, राजकीय रणनिती काय ठरते, हे कळावं, यासाठी हे फोन टॅप करण्यात आले असावे, असा संशयही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केला होता. खडसेंनीही फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपवर हल्लाबोल केला होता. माझे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याची टीका खडसेंनी केली होती.

चौकशी सुरु

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी खोटं बोलून फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे. याप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत.

फोन टॅपिंग गुन्हा आहे?

परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं कायद्यानं गुन्हा असून अधिकृत यंत्रणेशिवाय कुणाीही कुणाचा फोन टॅप करु शकत नाही. तसं केल्यास शिक्षा होऊ शकते. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तिंचाच फोन टॅप करतात. जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या फोन टॅप केला आणि त्याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सध्या रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिस याप्रकरणी सध्या या आरोपाच्या अनुशंगानं तपास करत आहेत.

पाहा, खडसेंनी काय म्हटलं?

फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया – पाहा Video

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.