“फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज” अजितदादांची टोलेबाजी

"देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत म्हणून" असं अजित पवार पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी म्हणाले.

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज अजितदादांची टोलेबाजी
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 12:01 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या 200 ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी “फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते” अशा शब्दात अजितदादांनी टोलेबाजी केली. (Pimpri Chinchwad COVID hospital inauguration by Ajit Pawar Devendra Fadnavis)

“गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असे अजित पवार म्हणाले.

“सिरम इन्स्टिट्यूटने भारती हॉस्पिटलमध्ये कोविडवरील लशीची मानवी चाचणी सुरु केली आहे” असे अजित पवार म्हणाले. खाजगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेकडून लेखा परीक्षण सुरु आहे. खाजगी रुग्णालयाने जास्त पैशाचा मलिदा काढण्याचा प्रयत्न करु नये” असा इशारा अजित पवारांनी दिला.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत म्हणून. राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावं” असंही ते यावेळी म्हणाले.

“आपण फिजिकल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरात मास्क वापरला नाही तर 1000 रुपये दंड आकारला पाहिजे” असे त्यांनी सांगितले. जुन्नर, खेड, आंबेगाव,शिरुर या ग्रामीण भागातील रुग्णदेखील जम्बो रुग्णालयात येतील. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव होणार नाही. हॉस्पिटलची भरभराट होऊ दे, असं बोलावंसं वाटत नाही, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. (Pimpri Chinchwad COVID hospital inauguration by Ajit Pawar Devendra Fadnavis)

“महाराष्ट्रात रोज 14 ते 15 हजार रुग्ण आढळत आहेत. पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. यासाठी महापालिका आणि शासनाचे आभार” असे मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण आटोपले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप होत आहे. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत 15 दिवसांमध्ये 200 ऑक्सिजनयुक्त बेड असलेले रुग्णालय उभारले. हे हॉस्पिटल आज नागरिकांच्या आरोग्य सेवेत समर्पित करण्यात आले.

(Pimpri Chinchwad COVID hospital inauguration by Ajit Pawar Devendra Fadnavis)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.