PCMC election 2022 : शिवसेना-भाजपातच रंगणार लढत की राष्ट्रवादी मारणार बाजी? पिंपरी चिंचवड प्रभाग 11 कुणाच्या वाट्याला?

मागील वेळी म्हणजेच 2017ला याठिकाणी भाजपाने चारही पॅनलमध्ये विजय प्राप्त केला होता. यावेळी तीन पॅनल असणार आहे. प्रभाग अकरामध्ये एकूण 15 उमेदवार होते. यात भाजपा क्रमांक एकवर तर त्यानंतर शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचा उमेदवार राहिला.

PCMC election 2022 : शिवसेना-भाजपातच रंगणार लढत की राष्ट्रवादी मारणार बाजी? पिंपरी चिंचवड प्रभाग 11 कुणाच्या वाट्याला?
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक, वॉर्ड 11Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 7:30 AM

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची (PCMC election 2022) लगबग सुरू झाली आहे. महापालिकेतर्फे प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक वॉर्ड लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आला आहे. मागील वेळी म्हणजेच 2017मध्ये चार जणांचे पॅनेल होते. यावेळी प्रभागामध्ये तीन जणांचे पॅनल असणार आहे. 139 जागांसाठी 46 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 11मध्ये मागील वेळी भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. प्रभाग अकरा अ,ब,क,ड अशा चारही विभागांत भाजपानेच (BJP) बाजी मारली होती. आता इंद्रायणीनगर, बालाजीनगरच्या या प्रभागात कोण विजयी होणार, याची उत्सुकता आहे. कारण राज्यात सत्तांतर झाले आहे. शिवसेनेतला (Shivsena) मोठा गट सध्या फुटला आहे. तो भाजपासोबत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची गणितेही बदलणार आहेत.

प्रभागातील व्याप्ती कशी?

इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा, सावतामाळी मंदीर रस्ता, विठोबा बनकर पथ, लांडेवाडी चौक, पवना इंडस्ट्रीयल इस्टेट, क्रांती चौक,

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 11मधील एकूण लोकसंख्या 37 हजार 360 असून यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 8908 तर अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 622 इतकी आहे. 2021मध्ये जनगणना झालेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या लोकसंख्येत आताची अतिरिक्त संख्या साधारणपणे 10 टक्के गृहीत धरण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

मागील वेळी म्हणजेच 2017ला याठिकाणी भाजपाने चारही पॅनलमध्ये विजय प्राप्त केला होता. यावेळी तीन पॅनल असणार आहे. प्रभाग अकरामध्ये एकूण 15 उमेदवार होते. यात भाजपा क्रमांक एकवर तर त्यानंतर शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचा उमेदवार राहिला. ब मध्ये एकूण 7 उमेदवार होते. इथे नऊ हजारांहून अधिक मतांसह भाजपा पहिल्या स्थानी, शिवसेना दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी पाहायला मिळाले. क मध्ये एकूण दहा उमेदवार तर ड मध्ये 13 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

विजयी उमेदवार (2017)

11 (A) बोबडे अश्विनी भीमा

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाशिल्पा उमेश साळवे--
भाजपाबोबडे अश्विनी भीमाबोबडे अश्विनी भीमा
काँग्रेसखवळे उषा हिरामण--
राष्ट्रवादीधेंडे गंगा संजय--
मनसे----
इतर----
11(B) नागरगोजे योगिता ज्ञानेश्वर

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाकल्पना अनिल सोमवंशी--
भाजपानागरगोजे योगिता ज्ञानेश्वरनागरगोजे योगिता ज्ञानेश्वर
काँग्रेस----
राष्ट्रवादीठोंबरे सुभद्रा ईश्वर--
मनसेसोनवणे मंगला अशोक--
इतर----
11 (C) नेवाळे संजय बबन

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासानप सचिन प्रभाकर--
भाजपानेवाळे संजय बबननेवाळे संजय बबन
काँग्रेसकसबे विशाल श्रीकांत--
राष्ट्रवादीथोरात एकनाथ दादा--
मनसेयादव संतोष सिद्धनाथ--
इतर----
11 (D) एकनाथ रावसाहेब पवार

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाजरे सचिन वसंत--
भाजपाएकनाथ रावसाहेब पवारएकनाथ रावसाहेब पवार
काँग्रेसमनोहर गोरख वाघमारे--
राष्ट्रवादीमगर अशोक जगन्नाथ--
मनसेमटकर सखाराम तुकाराम--
इतर----

आरक्षण कसे?

यावेळी महापालिकेतील आरक्षण बदलले आहे. त्यानुसार प्रभाग 11 अ अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब विभाग हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे. तर क विभाग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.