PCMC Election 2022 : शिवसेना-राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? वॉर्ड क्रमांक 15मध्ये आवाज कुणाचा?

| Updated on: Jul 13, 2022 | 8:35 AM

PCMC Election 2022 : पूर्वीच्या प्रभाग 15 मधून राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, भाजपच्या शैलजा मोरे, भाजपच्या शर्मिला बाबर आणि शिवसेनेचे अमित गावडे विजयी झाले होते. आता प्रभाग रचना बदलली आहे. अनेक प्रभागातील विभाग दुसऱ्या प्रभागात गेले आहेत.

PCMC Election 2022 : शिवसेना-राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? वॉर्ड क्रमांक 15मध्ये आवाज कुणाचा?
शिवसेना-राष्ट्रवादीचा करिश्मा की डाव भाजपचाच? वॉर्ड क्रमांक 15मध्ये आवाज कुणाचा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पिंपरी: इतर महापालिकांप्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेतही (PCMC Election 2022) निवडणुकीचं धुमशान सुरू झालं आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे उमदेवार आणि इच्छूक उमेदवार (candidate) कामाला लागले आहेत. आपल्या तिकीट कसे मिळेल याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. परिसीमनामुळे अनेक मतदारसंघात फेरबदल झाल्याने आपल्या सोयीच्या मतदारसंघात अनेकांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. आपल्याच हातात तिकीट पडावं म्हणून अनेकांनी तर आतापासूनच मतदारसंघात (ward) फिरण्यास सुरुवात केली आहे. मतदारांच्या घरी उठबस सुरू आहे. तर प्रत्येक विभागात जाऊन तेथील समस्या समजून घेतल्या जात आहेत. इतकंच कशाला वॉर्डात फलकबाजीही सुरू केली आहे. पिंपरी चिंचवडच्या अनेक भागात हे चित्रं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही कुतुहूल निर्माण झाल्याचं दिसून येतं आहे.

 प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय झालं?

आता परिसीमनामुळे वॉर्ड रचना बदलली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये विभागणी झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये चार वॉर्ड होते. अ, ब, क आणि ड. प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादीचे राजू मिसाळ विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 15 ब मधून भाजपच्या शैलजा मोरे विजयी झाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 15 क मधून भाजपच्या शर्मिला बाबर विजयी झाल्या होत्या. तर प्रभाग क्रमांक 15 ड मधून शिवसेनेचे अमित गावडे विजयी झाले होते. म्हणजे या प्रभागातील चार वॉर्डांपैकी दोन वॉर्डांवर भाजपने कब्जा केला होता. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक वॉर्ड जिंकता आला होता.

35 हजार मतदार ठरवणार नगरसेवक

नव्या परिसीमनातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 35 हजार 209 मतदार आहेत. त्यापैकी 1670 मतदार अनुसूचित जातीचे आहेत. तर 223 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. त्यामुळे हे 35 हजार 209 उमेदवार प्रभाग 15 मधील चार नगरसेवक ठरवणार आहेत.

प्रभाग क्रमांक 15 अ

पक्षाचे नावउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/ इतर

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

नव्या प्रभागरचनेत या मतदारसंघाची व्याप्ती स्पष्ट करण्यात आली आहे. संभाजीगनर, बर्डव्हॅली, वृंदावन सोसायटी, पूर्णानगर, शाहूनगर आणि आरटीओपर्यंत या मतदारसंघाची व्याप्ती आहे. या मतदारसंघात स्पाईन रस्ता, कुदळवाडी, चिखली, केएसबी चौकापासून ते थर्मेक्स चौकातील भाग, चिखली-आकुर्डीचा काही भाग आणि ओम साई चौकचा परिसर येतो.

प्रभाग क्रमांक 15 ब

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

यांचे काय होणार?

पूर्वीच्या प्रभाग 15 मधून राष्ट्रवादीचे राजू मिसाळ, भाजपच्या शैलजा मोरे, भाजपच्या शर्मिला बाबर आणि शिवसेनेचे अमित गावडे विजयी झाले होते. आता प्रभाग रचना बदलली आहे. अनेक प्रभागातील विभाग दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळेही आता हे नगरसेवक आहे त्या प्रभागातून लढणार की नव्या प्रभागात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 15 क

पक्ष उमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

यंदा तीन प्रभाग

मागच्यावेळी प्रभाग क्रमांक 15 मध्ये चार वॉर्ड होते. यंदा तीनच वॉर्ड ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 15 अ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक 15 ब आणि प्रभाग क्रमांक 15 क खुला झाला आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदारांना यंदा फक्त तीनच उमेदवार निवडून द्यायचे आहेत.