pcmc election 2022 | पिंपरी चिंडवड महापालिका निवडणूक, प्रभाग 23 वर भाजपची सत्ता कायम राहणार का? पुणेकरांचा कौल कुणाला?

2022मधील मनपा निवडणुकीत प्रभाग 23 मधील वॉर्ड अ हा सर्वसाधारण महिला वर्गासाठी , वॉर्ड ब आणि वॉर्ड क हा सर्वसाधारण वर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

pcmc election 2022 | पिंपरी चिंडवड महापालिका निवडणूक, प्रभाग 23 वर भाजपची सत्ता कायम राहणार का? पुणेकरांचा कौल कुणाला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 7:00 AM

पुणेः महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर प्रत्येक जिल्हा, शहर आणि गावातली राजकीय समीकरणंच बदलण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तर ठिकठिकाणी खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कोणत्या शहरावर कुणाची सत्ता येणार, याचे आडाखे आता नव्याने बांधले जात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची (Pimpari Chinchwad Municipal corporation) सार्वत्रिक निवडणूकदेखील लवकरच हईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मनपा प्रशासनाने निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावरील तयारी पूर्ण केली आहे. महापालिकेची प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतदेखील जाहीर झाली आहे. तसेच प्रत्येक वॉर्डातील लोकसंख्याही राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निश्चित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत यंदा 2017 मधील निवडणुकांच्या तुलनेत 2022 मध्ये तीन लाख लोकसंख्या वाढीव असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 23 वर भाजपचं वर्चस्व दिसून आलं होतं. 2022 मध्ये वॉर्डांमध्ये फेररचना झाली असून काही विभाग दुसऱ्या मतदार संघात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा साईनाथनगर, समर्थ कॉलनीचा परिसर असलेला प्रभाग क्रमांक 23 वर कुणाची सत्ता येईल याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

प्रभाग 23 मधील महत्त्वाचे भाग कोणते?

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार वॉर्डांचा समावेश होता. 2022 मधील प्रभाग रचनेनुसार, या वॉर्डाच वाहतूक नगरी, भक्ती शक्ती परिसर, सेक्टर नंबर 24,25, 26, 27, केंद्रीय वसाहत या परिसराचा समावेश आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत या प्रभागात चार वॉर्डांचा समावेश होता. यंदा मात्र तीन वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने केलेल्या प्रभाग रचनेनुसार, काही भागा इतर प्रभागात जाण्याची शक्यता आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 2021 मध्ये जनगणना झाली नसल्याने पूर्वीच्या लोकसंख्येत 10 टक्के लोकसंख्या वाढल्याचे गृहित धरण्यात आले आहे. त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 23 मधील एकूण लोकसंख्या 36 हजार 947 एवढी आहे. तर या प्रभागातील अनुसूचित जातींची संख्या 2,182 आणि अनुसूचित जमातींची संख्या 330 एवढी आहे. उर्वरीत मतदार हे सर्वसाधारण गटातील होते. त्यामुळे सर्वसाधारण गटातील मतदारांचा कौल उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

2017 मध्ये कुणाचं वर्चस्व?

2017 मधील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक 23मध्ये चार पैकी तीन वॉर्डांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचा विजय झाला होता. वॉर्ड अ मधून भाजपच्या मनीषा पवार, वॉर्ड ब मधून अर्चना बारणे, वॉर्ड कमधून अभिषेक बारणे तर वॉर्ड क्रमांक ड मधून कैलास बारणे यांचा विजय झाला होता. आता 2022 मधील निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेत बदल करण्यात आल्याने या प्रभागात तीन वॉर्ड देण्यात आले आहेत.

प्रभाग 23 मधील आरक्षण सोडत कशी?

2022मधील मनपा निवडणुकीत प्रभाग 23 मधील वॉर्ड अ हा सर्वसाधारण महिला वर्गासाठी , वॉर्ड ब आणि वॉर्ड क हा सर्वसाधारण वर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 23 वॉर्ड अ

पक्षउमेदवाराचं नावविजयी/आघाडी
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
शिवसेना
मनसे
इतर अपक्ष

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 23 वॉर्ड ब

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
अपक्ष, इतर

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 23 वॉर्ड क

पक्षउमेदवारविजय/आघाडी
भाजप
राष्ट्रवादी
शिवसेना
काँग्रेस
मनसे
अपक्ष
Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.