PCMC election 2022 | पिंपरी चिंडवड महापालिका निवडणूक, प्रभाग 24 मध्ये भाजप शिवसेनेत यंदाही तगडी फाईट होणार?

2022मधील मनपा निवडणुकीत प्रभाग 24 मधील वॉर्ड अ हा अनुसूचित जाती आणि महिला वर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. तर 24 ब हा सर्वसाधारण महिला आणि 24 क हा वॉर्ड सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी निश्चित करण्यात आला आहे.

PCMC election 2022 | पिंपरी चिंडवड महापालिका निवडणूक, प्रभाग 24 मध्ये भाजप शिवसेनेत यंदाही तगडी फाईट होणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:51 AM

पुणेः राज्यातील महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांचा (Municipal Corporation Election) बिगुल वाजला असून पिंपरी चिंचवड महापालिकेचाही (PCMC Election) यात समावेश आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी उफाळून आल्यानंतर सत्तेत महानाट्य घडलं आणि राज्यात सत्तांतर झालं. शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखीच ताणले गेले आहेत. तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतरही दुरावत चाललं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अनेक पक्षांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे तर अनेक उमेदावारांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुकही येत्या काही महिन्यात होईल. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत यंदा 2017 मधील निवडणुकांच्या तुलनेत 2022 मध्ये तीन लाख लोकसंख्या वाढीव असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 24 वर भाजप आणि शिवसेनेत तगडी फाइट दिसून आली होती. मागील वेळी हा प्रभाग चार वॉर्डांमध्ये विभागला गेला होता. यंदा मात्र तो तीन वॉर्डांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे काही भाग दुसऱ्या प्रभागात जाण्याची शक्यता आहे. आता 2022 मधील निवडणुकीत प्रभाग 24 वर भगव्याचं वर्चस्व की कमळाचं वर्चस्व असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय.

प्रभाग 24 मधील महत्त्वाचे भाग कोणते?

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये चार वॉर्डांचा समावेश होता. 2022 मधील प्रभाग रचनेनुसार, या वॉर्डात मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आदी भागाचा समावेश आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत या प्रभागात चार वॉर्डांचा समावेश होता. यंदा मात्र तीन वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने केलेल्या प्रभाग रचनेनुसार, काही भाग इतर प्रभागात जाण्याची शक्यता आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 2021 मध्ये जनगणना झाली नसल्याने पूर्वीच्या लोकसंख्येत 10 टक्के लोकसंख्या वाढल्याचे गृहित धरण्यात आले आहे. त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 24 मधील एकूण लोकसंख्या 38 हजार 779 एवढी आहे. तर या प्रभागातील अनुसूचित जातींची संख्या 8023 आणि अनुसूचित जमातींची संख्या 1521 एवढी आहे. उर्वरीत मतदार हे सर्वसाधारण गटातील होते. त्यामुळे सर्वसाधारण गटातील मतदारांचा कौल उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

2017 मध्ये कुणाचं वर्चस्व?

2017 मधील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक 24मध्ये चार पैकी दोन वॉर्जात शिवसेना तर एका वॉर्डात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर चौथा अपक्ष उमेदवार हा भाजप पुरस्कृत होता. या प्रभागात अ वॉर्डात शिवसेनेचे सचिन भोसले, ब वॉर्डात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार झामाबाई बारणे, तर क वॉर्डात भाजपाच्या माया बारणे आणि शिवसेनेचे नीलेश बारणे हे ड वॉर्डातून विजयी झाले होते. यंदा मात्र चार वॉर्डांऐवजी तीन वॉर्ड या प्रभागात आहेत. त्यामुळे उपरोक्त उमेदवार कोणत्या वॉर्डातून उभे राहतील आणि शिवसेना भाजपमध्ये कशी लढाई होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रभाग 24 मधील आरक्षण सोडत कशी?

2022मधील मनपा निवडणुकीत प्रभाग 24 मधील वॉर्ड अ हा अनुसूचित जाती आणि महिला वर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. तर 24 ब हा सर्वसाधारण महिला आणि 24 क हा वॉर्ड सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी निश्चित करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 24 वॉर्ड अ

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
अपक्ष

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 24 वॉर्ड ब

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
अपक्ष/इतर

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 24 वॉर्ड क

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
शिवसेना
मनसे
अपक्ष
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.