आधी पोस्टर अन् आता थेट भाष्य; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता शिरूरमधून लोकसभेसाठी मैदानात

Shirur Loksabha Constituency : राष्ट्रवादीचा 'हा' नेता शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार; अमोल कोल्हेंना आव्हान?

आधी पोस्टर अन् आता थेट भाष्य; राष्ट्रवादीचा 'हा' नेता शिरूरमधून लोकसभेसाठी मैदानात
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 2:46 PM

पिंपरी चिंचवड : 2024 मध्ये देशाची सार्वत्रित निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी असो की विरोधक सगळेच तयारीला लागलेत. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आज सकाळी तसे पोस्टर शिरूर मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये पाहायला मिळाले. तर आता टीव्ही 9 मराठीशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विलास लांडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छांच्या पोस्टरवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. तर विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका आहे. शेवटी पक्षश्रेष्ठ ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल, असं विलास लांडे म्हणालेत.

मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.

2019 पासूनच मी लोकसभा निवडणुकीची तयारी करत होतो. आगामी लोकसभेला अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांना माझा विरोध नाही. खासदार म्हणून त्यांनी अनेक चांगली काम केलेली आहेत. ते चांगले कार्यकर्ते आहेत. विरोधाला विरोध करण्यापेक्षा चर्चा करावी. ते उभे राहत असतील तर माझा त्यांना विरोध नाही, असंही विलास लांडे यांनी स्पष्ट केलं.

विलास लांडेच्या वाढदिवसाच औचित्य साधत शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेच शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय, अशी विलास लांडे यांची ओळख आहे.

संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडे कडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर भावी खासदार आणि संसदेचा फोटो पाहायला मिळत आहे.

मागच्यावेळी देखील लोकसभा निवडणुकीसाठी विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातुन इच्छुक होते. तेव्हाही लांडेनी मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.