मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटण्याचा प्लॅन, मात्र RTPCR चाचणी अभावी प्रवेश नसल्याने राज ठाकरे माघारी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी ही कोरोना चाचणी (Corona test) केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात (Vidhan Bhawan) येता आलं नाही.

मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटण्याचा प्लॅन, मात्र RTPCR चाचणी अभावी प्रवेश नसल्याने राज ठाकरे माघारी?
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 3:10 PM

मुंबई : ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Maharashtra Vidhan Bhawan) येणार होते. पण राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड 19 (Covid19) संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आधीच मास्क घालत नव्हते. त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणार्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत त्यांचं पालन राज ठाकरे करणार होते का..? हा देखील प्रश्नं विधान भवनात चर्चेत होता. पण अखेर RTPCR चाचणी केली नसल्यामुळे राज ठाकरे विधान भवनात आलेच नाहीत.

राज ठाकरे हे वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार होते अशी माहिती आहे. त्यासाठी ते मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र मंत्रालयात विनामास्क आणि विना RTPCR चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली. राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची कुणकुण लागल्याने राज ठाकरे माघारी फिरल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वी राज ठाकरे मास्कबाबत काय म्हणाले होते? 

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. परंतु त्यावेळी ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले होते. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

VIDEO : “मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो”

संबंधित बातम्या 

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर सरकार जबाबदार नाही: विजय वडेट्टीवार

(Plan to meet Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray at mantralay, but Raj Thackeray withdrew as there was no admission without mask)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.