राहुल गांधी आधी म्हणाले भेट राजकीय नव्हती, आता जाहीर सभेत खळबळजनक दावे
पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची त्यांच्या प्रकृतीची विचारपूरस करण्यासाठी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, असं राहुल गांधींनी भेटीनंतर स्पष्ट केलं. पण यानंतर लगेचच जाहीर सभेत राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना आपल्याला राफेल व्यवहाराबाबत सांगितल्याचा दावा केला. यावर मनोहर पर्रिकरांनी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय […]
पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची त्यांच्या प्रकृतीची विचारपूरस करण्यासाठी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, असं राहुल गांधींनी भेटीनंतर स्पष्ट केलं. पण यानंतर लगेचच जाहीर सभेत राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना आपल्याला राफेल व्यवहाराबाबत सांगितल्याचा दावा केला. यावर मनोहर पर्रिकरांनी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय तुम्ही मला भेटलात आणि मी आपला सन्मान केला. पण ही माझी चूक होती का? आपल्या पाच मिनिटांच्या संवादात आपण राफेल व्यवहाराविषयी एक शब्दही बोललो नाहीत. कृपया या भेटीचा राजकीय फायद्यासाठी वापर करु नका, अशी विनंती पर्रिकरांनी पत्र लिहून केली आहे.
आपल्या भेटीनंतर तुम्ही काही दावे केल्याचं बातम्यांमधून समजलं. पण राफेल हा शब्दही आपल्या भेटीत निघाला नव्हता. मी एका जीवघेण्या आजाराशी लढत असताना गोव्याच्या जनतेची सेवा करतोय. सौजन्या दाखवण्यासाठी घेतलेल्या या भेटीचा तुम्ही जो राजकीय वापर केलाय, त्याने मला दुःख झालंय. कृपया यापुढे तुम्ही असं करणार नाही, याची अपेक्षा करतो, असंही पर्रिकरांनी पुढे म्हटलंय.
Goa CM Manohar Parrikar writes to Congress President Rahul Gandhi, writes "I feel let down that you have used this visit for your petty political gains. In the 5 minutes you spent with me, neither did you mention anything about Rafale, now did we discuss anything related to it.' pic.twitter.com/HbUX6yiDk3
— ANI (@ANI) January 30, 2019
राहुल गांधी भेटीनंतर काय म्हणाले?
राहुल गांधी दिल्लीत युवा काँग्रेसच्या कार्यक्रमात म्हणाले की, “मी काल तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटलो. पर्रिकर यांनी स्वतः सांगितलं की राफेल डील बदलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला साधं विचारलंही नव्हतं”, असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला. यानंतर पर्रिकरांनी हा दावा फेटाळत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी गोव्यात जाऊन मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर सध्या कॅन्सरने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही ते मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. राहुल गांधी यांनी ही खाजगी भेट असल्याचं सांगितलं आणि पर्रिकरांच्या प्राकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली. पण दुसऱ्याच दिवशी जाहीर सभेत या भेटीचं राजकारण करण्यात आल्याने पर्रिकर नाराज झाले आहेत.
अमित शाहांकडूनही नाराजी
राहुल गांधींनी असंवेदनशीलता दाखवल्याबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाहांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जीवघेण्या आजाराशी लढत असलेल्या व्यक्तीच्या नावाचा वापर करुन तुम्ही किती असंवेदनशील आहात ते दाखवून दिलंय. पर्रिकरांनी तुमच्या आरोपांबाबत योग्य ते स्पष्टीकरण दिलंय, असं ट्वीट अमित शाहांनी केलं.