Eknath Shinde: नव्या सरकारला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचेही आशीर्वाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आतापर्यंत राज्याच्या विकासासाठी आणि नैसर्गिक युती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरु अनंद दिघे यांचा आशिर्वाद होता असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या दोघांबरोबर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आशिर्वाद असल्याचे म्हणले आहे.
दिल्ली : सत्ता स्थापनेनंतर (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे पहिल्यांदाच (Delhi) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे या दौऱ्याला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. पण सत्ता स्थापनेनंतर वरिष्ठांचे आशीर्वाद घेणे ही (Maharashtra) महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे येथील सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन राज्याच्या विकासासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या दोघांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे अध्यत्र जे.पी. नड्डा यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला. मात्र, यामध्ये कोणताही राजकीय संवाद झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याच्या विकासात केंद्राचीही भूमिका
राज्यातील विकास कामांमध्ये केंद्राचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि राज्याबाबत काय धोरण आहे या बद्दलच्या विचारांची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा दौरा आहे. यामध्ये राजकीय बाबींवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण हा दौरा सर्वच दृष्टीने महत्वाचा होता. हे कुणापासून लपून राहिलेले नाही. 11 तारखेला न्यायालयात होणारी सुनावणी, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विकास कामाच्या अनुशंगाने महत्वाचा राहणार आहे. राज्याच्या विकास कामात केंद्राचे योगदान आणि व्हिजन हे देखील महत्वाचे असल्याने ही सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख, अनंद दिघेंच्या पंक्तीमध्ये आता मोदीही
आतापर्यंत राज्याच्या विकासासाठी आणि नैसर्गिक युती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरु आनंद दिघे यांचा आशिर्वाद होता असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या दोघांबरोबर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आशिर्वाद असल्याचे म्हणले आहे. बंडखोरीपासून ते सत्ता स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव घेतले होते. आता यामध्ये भाजपाच्या नेत्यांचीही भर पडली आहे. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही आशिर्वाद असल्याचे म्हणले आहे.
ही तर सदिच्छा भेट
गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत कोणती चर्चा झाली नाहीतर ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तब्बल 4 तास बैठक झाली आहे. मात्र, सत्ता स्थापनेनंतर वरिष्ठांचा आशिर्वाद गरजेचा असतो. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. ही औपचारिकता भेट होती तर आषाढी वारीनंतर विकासाच्या दृष्टीने सखोल चर्चा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.