पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणातील रिंग मास्टर; कुणी केली टीका?

मराठा आरक्षण हा अंतर्गत लढा आहे. निजामी मराठा आणि रयतेचा मराठा असा हा संघर्ष आहे. 70 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेतल्या मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं. आज या रयतेतल्या मराठ्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. पण त्यांनाही खाली खेचण्याचं काम केलं जात आहे. काहीजण मराठा विरुद्ध ओबीसी असं भिडवण्याचा प्रयत्न करत आहे. अदृश्य शक्ती हे काम करत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणातील रिंग मास्टर; कुणी केली टीका?
pm modi Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:25 PM

सांगली | 29 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येणं आपल्या हातात आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर हे साांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेतील ईदगाह मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज आणि मोहल्ला कमिटीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आंबेडकर यांच्यासमोर ईव्हीएम मशीनबाबत तक्रार केली. त्यावर इलेक्शन कमिशन आणि सरकार दोघेही ईव्हीएम मशीनच्या तपासणीच्या विरोधात आहेत. त्यामुळे ते बॅलेटपेपरवर मतदान घेत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएमला विरोध

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर होण्यासाठी विविध पर्यायही सांगितले. जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.

देशात काहीही घडू शकतं

सध्या राजकारणात समझोता चालू आहे. शेवटी राजकारण आहे. काहीही घडू शकते. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आम्ही सध्या जाहीर सभा घेऊ शकतो. केंद्र सरकारचे एक एक धोरण विचारपूर्वक नसल्याचं दिसत आहे. देशातील मुस्लिमांसोबत जसे भाजपा वागत आहे, तसेच दुसऱ्या राष्ट्रांशी वागत आहे. तुम्ही ख्रिश्चनांविरोधात आहात, मग उद्या अमेरिका आणि युरोपबाबत हेच मापदंड लावणार का? केंद्राचं धोरण अपरिपक्व आहे. हे धोरण जातीय व्यवक्थेवर आधारीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी विचारावं

ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत. त्यांनी केंद्र सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये धार्मिकता का आणताय? आमचे नातेवाईक धोक्यात का घालताय? असं विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

पोलीस ठाण्याला विचारा

राज्यात दंगली घडतील असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दंगली घडवण्याचा अलर्ट पोलिसांना आला की नाही हे प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन विचारा. पोलीस ठाण्यात अलर्ट आला आहे. आधी आयबीला येत होता. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.