शाल घेऊन मुस्लीम वृद्ध ताटकळ उभा, मोदींनी लाखोंचा रोड शो थांबवला
वाराणसी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असल्यामुळे सभा आणि रोड शोचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये सात किमीचा रोड शो केला, ज्यात लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. पण या रोड शोमध्ये एका मुस्लीम वृद्धाने लक्ष वेधून घेतलं, ज्यांच्यासाठी मोदींनी लाखोंचा रोड शो थांबवला. मोदींनी […]
वाराणसी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असल्यामुळे सभा आणि रोड शोचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये सात किमीचा रोड शो केला, ज्यात लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. पण या रोड शोमध्ये एका मुस्लीम वृद्धाने लक्ष वेधून घेतलं, ज्यांच्यासाठी मोदींनी लाखोंचा रोड शो थांबवला.
मोदींनी वाराणसीत सात किमीचा रोड शो काढला असताना रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. मोदी जनतेला अभिवादन करत होते. त्याचवेळी एक वृद्ध मोदींना शाल देण्यासाठी प्रयत्न करत होता. या वृद्धाकडे मोदींची नजर गेली आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगून ती शाल घेण्यासाठी सांगितलं. पण गर्दी प्रचंड असल्यामुळे गोंधळ उडाला. अखेर मोदींनी ती शाल फेकण्यासाठी सांगितलं. या व्यक्तीने शाल फेकली आणि सुरक्षा रक्षकांनी ती मोदींच्या हातात दिली. मोदींनीही ही शाल गळ्यात घातली आणि रोड शो पुढे सुरु केला.
पाहा व्हिडीओ :
रोड शो के समय एक बुजुर्ग व्यक्ति @narendramodi जी को शॉल देने का प्रयास कर रहा था, तो देखिए क्या किया मोदी जी ने। #DeshModiKeSaath pic.twitter.com/BkvQ3ulr24
— BJP (@BJP4India) April 26, 2019
मोदींनी गुरुवारी भव्य रोड शो केल्यानंतर आज पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एनडीएतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते वाराणसीत हजर होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही वाराणसीत हजेरी लावली.