14 देशांचे प्रमुख, 6000 पाहुणे, राष्ट्रपती भवनात आतापर्यंतचा सर्वात मोठा शपथविधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहतील. राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. याशिवाय 14 देशांचे प्रमुखही या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहतील. राष्ट्रपती भवनात या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. याशिवाय 14 देशांचे प्रमुखही या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
30 मे रोजी 7 वाजता मोदी शपथ घेतील. मोदींसोबतच मंत्रिमंडळातील इतर सदस्यही शपथ घेतील. मोदी शपधविधीपूर्वी महात्मा गांधींचं समाधीस्थळ राजघाट, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावरही जातील. शिवाय शहीद दिल्ली गेटला शहीद स्मारकावर ते शहिदांनाही श्रद्धांजली वाहतील. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वायू भवन, सैन्य भवन, रेल्वे भवन, डीआरडीओ, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक या कार्यालयांमध्ये दुपारी 2 वाजल्यापासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
14 देशांच्या प्रमुखांची उपस्थिती
राष्ट्रपती भवनात आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातंय. या कार्यक्रमात सहा हजार पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. शपथविधीमध्ये BIMSTEC समुहातील देशांचे प्रमुख, शांघाय संघटनेचे अध्यक्ष (SCO), किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशिअसचे पंतप्रधान उपस्थित राहतील. एकूण 14 देशांच्या प्रमुखांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती असेल.
राहुल गांधी, मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांसह अनेक नेत्यांची उपस्थिती असेल. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनी कार्यक्रमाला येणार नसल्याचं कळवलंय. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण पाठवण्यात आलंय.
या कार्यक्रमाला एनडीएमधील घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित असतील. जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचं सरकार असणारे मोदी तिसरे पंतप्रधान आहेत. 543 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत यावेळी एकट्या भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत, तर एनडीएच्या खात्यात 353 जागा आहेत.