मोदींपासून मिटकरींपर्यंत, पवारांना कोण, कशा, कुठल्या शुभेच्छा देतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस... विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मोदींपासून मिटकरींपर्यंत, पवारांना कोण, कशा, कुठल्या शुभेच्छा देतंय?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:18 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्यावर दिग्गज नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यापासून ते महाविकास आघाडीचे शिल्पकार किंबहुना ठाकरे सरकार बनवण्यात पवारांएवढाच ज्यांचा मोलाचा वाटा आहेत ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीची धडाडती तोफ अमोल मिटकरी आदींनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Pm Modi, Udhav thackeray, Political leaders Wishesh Sharad Pawar on his Birthday)

पवारसाहेबांना निरोगी आयुष्य लाभो- पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवारसाहेबांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… अशा आशयाचं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पवारसाहेबांच्या उर्जेने आम्हाला प्रेरणा मिळते- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्रीला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा- अजित पवार

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो, असं ट्विट करत अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार व्यक्ती नसून विचार- जयंत पाटील

पवार साहेबांइतकी माणसांची पारख असणारा व्यक्ती माझ्या पाहण्यात तरी दुसरा नाही. लोक अनेकदा पवार साहेबांना हिमालयाची उपमा देतात पण मला पवार साहेबांचे व्यक्तिमत्व कायम समुद्रासारखे वाटत आले आहे. अथांग असा समुद्र कायम जे काही येईल ते आपल्यात सामावून घेत असतो, आपलेसे करत असतो, तसे आजूबाजूला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रसंगाला आपल्यासारखे करण्याची किमया साहेबांना साध्य झाली आहे. शरद पवार व्यक्ती नसून विचार आहे नव्हे ते विद्यापीठ आहे.

पवारसाहेब एक नाव नाही, एक मोहिम, एक वसा…- धनंजय मुंडे

पवार साहेब..एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे,एक मोहीम,एक वसा आहे!राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे! आदरणीय पवारसाहेबांना 80व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना…

साहेब तुम्ही होतात म्हणून….- संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना केवळ तीन शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साहेब तुम्ही होतात म्हणून… या तीन शब्दात त्यांनी त्यांच्या मनातील असंख्य भावना जागवल्या आहेत.साहेब, तुम्ही होता म्हणूनी… देशाचे नेते आदरणीय साहेबांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!, असं ट्विट त्यांनी केलंय.

माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता आपल्यामुळे आमदार- अमोल मिटकरी

साहेब शतायुषी व्हा. आपला परिसस्पर्श झाल्यामुळे माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता आज विधिमंडळाचा सदस्य झाला. आपले आशीर्वाद व आपली प्रेरणा ही आम्हाला कायम उर्जास्त्रोत आहे. आमच्या अनंत पिढ्यांवर आपण केलेल्या उपकाराला आम्ही कधीच विसरू शकणार नाही. उदंड आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

(Pm Modi, Udhav thackeray, Political leaders Wishesh Sharad Pawar on his Birthday)

संबंधित बातम्या

Sharad Pawar Birthday | 81 पावसाळे पाहिलेला योद्धा; शरद पवारांच्या 81 गोष्टींचा खास आढावा

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.