मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा, विदर्भातील 10 जागांसाठी भाजपने कंबर कसली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा सुरु सुरु झालाय. एका एका दिवसात मोदींच्या चार ते पाच सभा होत आहेत. बुधवारीही मोदींच्या एका दिवसात चार सभा होणार आहेत. त्यापैकी शेवटची सभा ही महाराष्ट्रात होत आहे. बुधवारची पहिली सभा पूर्वेकडील सर्वात शेवटचं राज्य अरुणाचल प्रदेशात, तर दुसरी सभा पश्चिमेला असलेल्या महाराष्ट्रात […]

मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा, विदर्भातील 10 जागांसाठी भाजपने कंबर कसली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा सुरु सुरु झालाय. एका एका दिवसात मोदींच्या चार ते पाच सभा होत आहेत. बुधवारीही मोदींच्या एका दिवसात चार सभा होणार आहेत. त्यापैकी शेवटची सभा ही महाराष्ट्रात होत आहे. बुधवारची पहिली सभा पूर्वेकडील सर्वात शेवटचं राज्य अरुणाचल प्रदेशात, तर दुसरी सभा पश्चिमेला असलेल्या महाराष्ट्रात होईल.

मोदींचा प्रचार दौरा सकाळी साडे आठ वाजताच सुरु होईल. पूर्व अरुणाचल प्रदेशातील पसीघाटमधील जनरल मैदानावर मोदींची पहिली सभा आहे.

मोदींची दुसरी सभा पश्चिम बंगालमध्ये होईल. सव्वा अकरा वाजता या सभेची वेळ देण्यात आली आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील जलपैगुरीमध्ये ही सभा आहे.

मोदींची एकाच दिवसातली तिसरी सभा ही दुपारी दोन वाजता पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात होईल. भर उन्हात ही सभा होणार आहे.

मोदींची एकाच दिवसातली चौथी सभा गोंदियात होणार आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सात जागांसाठी मतदान होणार आहे, ज्यात सर्व जागा विदर्भात आहेत. गोंदियातली सभा बालाघाट टी-पॉईंट मैदानावर सायंकाळी पाच वाजता होईल.

गोंदियातली सभा मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा असेल. यापूर्वी वर्ध्यात पहिली सभा झाली होती. दुसऱ्या सभेत संपूर्ण विदर्भ कव्हर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कारण, यानंतर मोदींच्या मराठवाड्यातल्या सभा सुरु होतील. वर्ध्यातील सभेत लोकांना उन्हाचा तडाखा बसला होता. पण यावेळी सायंकाळी सभा ठेवण्यात आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.