मोदींना संसदेत भेटायला आलेला हा ‘खास मित्र’ कोण?

खुद्द पंतप्रधान मोदींनीच या खास मित्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा खास मित्र दुसरा तिसरा कुणी नसून एक चिमुकला आहे. या चिमुकल्यासोबतचे काही क्षण मोदींनी इंस्टाग्रामवर (Narendra Modi Instagram) शेअर केले आहेत.

मोदींना संसदेत भेटायला आलेला हा खास मित्र कोण?
| Edited By: | Updated on: Jul 23, 2019 | 4:05 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी संसदेत त्यांचा एक खास मित्र आला. खुद्द पंतप्रधान मोदींनीच या खास मित्रासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा खास मित्र दुसरा तिसरा कुणी नसून एक चिमुकला आहे. या चिमुकल्यासोबतचे काही क्षण मोदींनी इंस्टाग्रामवर (Narendra Modi Instagram) शेअर केले आहेत. या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक केलं जातंय.

संसदेत आज मला भेटण्यासाठी माझा खास मित्र आला, असं कॅप्शन देत मोदींनी हे फोटो शेअर केले. मोदींच्या टेबलवर या चिमुकल्यासमोर काही चॉकलेट्सही दिसत आहेत. हे चॉकलेट्स पाहून चिमुकला आणखी उत्साहित झाला. हा चिमुकला भाजपचे राज्यसभा खासदार सत्यनारायण जाटिया यांचा नातू (Satyanarayan Jatiya) आहे. सत्यनारायण जाटिया हे यापूर्वी उज्जैनचे खासदारही होते, शिवाय त्यांनी केंद्रात मंत्रिपदही सांभाळलेलं आहे.

 

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही परदेश दौऱ्यावर असताना लहान मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात प्रोटोकॉल बाजूला ठेवून मोदी मुलांशी गप्पा मारताना दिसतात. आता या चिमुकल्याचा फोटोही चांगलाच व्हायरल होतोय. कामातून वेळ काढत मोदींनी या चिमुकल्यासोबत काही वेळ घालवला. यावेळी रामशेठ जातीय यांचा मुलगा आणि सूनही उपस्थित होते.