पुस्तक झालं आता व्हिडीओ आला, निंदनीय! भाजपने उत्तर द्यावं : संभाजीराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला, निंदनीय! भाजपने उत्तर द्यावं : संभाजीराजे
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 1:27 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रश्न विचारले असताना, आता राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati on Modi Shah) यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. (Sambhaji Chhatrapati on Modi Shah)

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनीय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये संभाजीराजे म्हणतात, “आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये”.

पुस्तक वाद

भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन देशभर वादंग रंगला. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं.  या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला. या पुस्तकावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना भाजपचा राजीनामा देऊन भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानानंतर भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला होता.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा, असं  संभाजीराजे म्हणाले होते.

याशिवाय संभाजीराजे म्हणाले, “दिल्लीच्या भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मात्र, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होणार नाही. त्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. नाहीतर हा वाद वाढून याचे वाईट परिणाम होतील.”

संजय राऊत यांचा हल्ला

दरम्यान, मोदी आणि अमित शाह यांंचे छत्रपती शिवराय आणि तानाजी मालुसरेंच्या रुपातील फोटो व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढवला.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत? मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे”, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

संबंधित बातम्या :

उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन करणार नाही : संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ‘हे’ मान्य आहे का? संजय राऊतांचा उदयनराजे आणि संभाजीराजेंना सवाल

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.