बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. दरम्यान आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत बिहारमध्ये 8.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत बिहारमध्ये 8.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज फोर्ब्सगंज आणि सहरसा इथं रॅली काढून मतदारांना संबोधित करणार आहेत. तर राहुल गांधी कटिहार आणि किशनगंज मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. तर मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज आणि अररियामध्ये राहुल गांधी यांच्या रॅली होणार आहेत. (PM Narendra Modi and Rahul Gandhi again face off today in Bihar )
तेजस्वी यादवांकडून स्वागत, आश्वासनांचीही आठवण!
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करुन पंतप्रधान मोदी यांचं बिहारमध्ये स्वागत केलं आहे. ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बिहारची समस्त जनता पुन्हा एकदा आपल्या बिहार दौऱ्याचं स्वागत करते आहे. तुम्हाला एक पत्र लिहिलं आहे. आशा करतो की गेल्या 6 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कराल’, अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.
आदरणीय प्रधानमंत्री जी, समस्त बिहारवासी पुनः आपके बिहार आगमन पर हार्दिक अभिनंदन करते है।
आपके नाम एक पत्र लिखा है। आशा करते है कि आप बिहारवासियों से विगत 6 वर्षों में किए गए वादों को भूले नहीं होंगे एवं उन्हें पूरा करेंगे। pic.twitter.com/PvismpqUB9
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 3, 2020
दुसऱ्या टप्प्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 8.14 टक्के मतदान
बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 वाजेपर्यंत 8.14 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळं सकाळच्या सत्रात मतदान धिम्या गतीनं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
तेजस्वी, तेजप्रताप यांचं भविष्य आज मतदान यंत्रात!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु झालं आहे. एकूण 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघात मतदान होत आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवारासाठी आज मतदान होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.
अच्छी शिक्षा, बेहतर स्वास्थ्य व क़ानून व्यवस्था और विकसित बिहार के लिए मतदान अवश्य करें। नए दौर में नए बिहार के लिए बदलाव अति आवश्यक है। जय हिंद, जय बिहार।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 3, 2020
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणा आहेत. त्यापैकी 143 महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 2 कोटी 85 लाख 50 हजार 285 मतदार आपला हक्क बजावतील. यात 1 कोटी 35 लाख 16 हजार 271 महिला तर 980 ट्रान्सजेंडर मतदार आहेत.
संबंधित बातम्या:
10 राज्यांतील 54 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक, मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष
PM Narendra Modi and Rahul Gandhi again face off today in Bihar