Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बिहारमध्ये रॅली आणि सभा होणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 8:23 AM

पाटना: बिहार विधानसभा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदानाला आता एक आठवडाही राहिलेला नाही. सत्ताधारी भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJDच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. त्यातच लोक जनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांनी दंड थोपटल्यानं निवडणुकीत अधिकच रंगत आलीय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमध्ये आमने-सामने येणार आहेत. (Bihar assembly election PM narendra modi and Rahul Gandhi face off today )

बिहारमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन रॅली होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार असतील तर राहुल गांधी यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री आणि RJD नेते तेजस्वी यादव असणार आहेत.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचा सभांचा धडाका

२८ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या आज बिहारमध्ये तीन सभा होणार आहेत. रोहतास जिल्ह्यातील डेहरी ऑन सोन, गया आणि भागलपूर इथं पंतप्रधान मोदी यांची रॅली आणि सभा होणार आहे. भाजपकडून मिळालेल्या माहितीनुसार डेहरी आणि भागलपूरमधील सभा दरम्यान नितीश कुमार पंतप्रधान मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर असतील. तर गया इथं JDUचे खासदार राजीव रंजन सिंह हे पंतप्रधानांसोबत असतील. तर हिदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी हे देखील गयामध्ये मोदींसोबत व्यासपीठावर असतील.

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज दोन रॅली होणार आहेत. नवादा जिल्ह्यातील हिसुआ आणि भागलपूर जिल्ह्यातील कहलगांव इथं राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. यावेळी RJD नेते तेजस्वी यादव हे राहुल यांच्यासोबत हिसुआतील रॅली आणि सभेत सहभागी होणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रॅली आणि सभा दरम्यान काही नियमावली जारी करण्यात आली आहे.

बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणार, भाजपचं वचन!

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुन सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. कोरोनाची लस आल्यानंतर बिहारमधील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जाईल, असं आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेस आणि विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही, मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून, सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला आहे’, अशी माहिती सुशीलकुमार मोदींनी दिली.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर IT ची धाड, कारमध्ये 8 लाख रुपये सापडल्याने सुरजेवालांची चौकशी

Bihar Election | मत द्यायचे नसेल तर नका देऊ, लालूप्रसादांच्या जयघोषामुळे नितीश कुमार भडकले

काँग्रेसला बिहार निवडणुका संपण्याची प्रतीक्षा, मोठ्या बदलाचे संकेत

Bihar assembly election PM narendra modi and Rahul Gandhi face off today

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.