शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. | Sharad Pawar
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (PM Narendra Modi giving good wishes to Sharad Pawar)
कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची अचानक इतकी काळजी का वाटू लागली, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
‘शरद पवार आणि अमित शाहांच्या कथित भेटीने राजकारणाचे संदर्भ बदलले’
शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भ अचानक बदलले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या ट्विटर हँडलवरून प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत. मात्र, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीविषयी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जवळीक निर्माण झाली आहे का, असा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या
शरद पवार रुग्णालयात, भाजप नेते म्हणाले, तुम्ही आधारवड, आता केंद्रीय मंत्र्याचाही तात्काळ फोन
पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?
एण्डोस्कोपी म्हणजे काय? ती वेदनादायी असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?
(PM Narendra Modi giving good wishes to Sharad Pawar)