पंजाबमधल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींकडून ‘आप’चं अभिनंदन, सहकार्याचं आश्वासन
राजधानी दिल्लीतून सीमोल्लंघन करत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानं (Aam Adami Party) पंजाबमध्ये (Punjab) आपला झाडू फिरवलाय. सत्ताधारी काँग्रेसला धुळ चारत आपनं पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून सीमोल्लंघन करत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानं (Aam Adami Party) पंजाबमध्ये (Punjab) आपला झाडू फिरवलाय. सत्ताधारी काँग्रेसला धुळ चारत आपनं पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला आहे. 117 जागांपैकी आप सध्या 92 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 18 जागी आघाडीवर आहे. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झाला आहे. इतकंच नाही तर पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबमधील मोठ्या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आज बाबासाहेब आंबेडरकर आणि शहीद भगतसिंग यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण याठिकाणी पाहणार आहोत.
दरम्यान, पंजाब निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपचे अभिनंदन केले आहे. तसेच, पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदींनी ट्विट करत आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटलंय की, पंजाब निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. मी पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.
I would like to congratulate AAP for their victory in the Punjab elections. I assure all possible support from the Centre for Punjab’s welfare. @AamAadmiParty
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2022
आम आदमी पार्टीने व्यवस्था बदलली
अरविंज केजरीवाल म्हणाले की कॅप्टनसाहेब हरले, चन्नीही हरले, नवज्योतसिंह सिद्धू हरले. हा मोठा विजय आहे. भगतसिंग म्हणाले होते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण व्यवस्था बदलली नाही तर काही बदललं नाही. पंजाबच्या जनतेनं यावेळी व्यवस्था बदलली आहे. तर आपने देशात व्यवस्था बदलली आहे.
केजरीवाल देशाचा खरा पुत्र
माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं. केजरीवाल दहशतवादी असल्याचं म्हटलं गेलं. मात्र या निकालातून जनतेनं सांगितलं की केजरीवाल दहशतवादी नाही तर या देशाचा खरा पुत्र आहे, अशा शब्दात केजरीवाल यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
केंद्र सरकारवर जोरदार टीका
केजरीवाल म्हणाले की, आज नव्या भारताचा संकल्प करू. नवा भारत ज्यात द्वेष नसेल, माता-भगिनी सुरक्षित असतील, प्रत्येकाला शिक्षण असेल. आपण असा भारत बनवू, ज्यात अनेक मेडिकल कॉलेज असतील, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना यूक्रेनमध्ये जावं लागणार नाही, अशा शब्दात केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.
अब भारत को दुनिया का नंबर 1 देश बनने से कोई नहीं रोक सकता ❤️??
– श्री @ArvindKejriwal #AAPSweepsPunjab pic.twitter.com/dqKwbNBN5J
— AAP (@AamAadmiParty) March 10, 2022
आम आदमी पार्टीत प्रवेश करा
पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी महिला, युवक, शेतकरी, गरीब जनता अशा सर्वांना आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केलंय. आज मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानात नोकरी करणाऱ्या व्यक्तीने चरणजितसिंह चन्न यांचा पराभव केलाय. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवज्योतने मजीठिया यांचा पराभव केला, सिद्धू यांचाही पराभूत केला. त्यामुळे आता आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केलंय.
आम्ही द्वेषाचं नाही तर सेवेचं राजकारण करणार
माझे लहान बंधू भगवंत मान यांना पंजाबचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. संपूर्ण निकाल अजून बाकी आहे. इतकं मोठं बहुमत. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही, असं केजरीवाल म्हणाले. त्याचबरोबर माझ्या कपड्यांवर टीका झाली. माझ्या रंगाबाबत बोललं गेलं. पण आम्ही द्वेषाचं नाही तर सेवेचं राजकारण करु. त्यासाठी मी हनुमानाचा आशीर्वाद घेतला आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :