Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आणि मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पंतप्रधानांनी पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा कंदिल दाखवला. मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचंही भूमीपूजन केलं.

VIDEO: आणि मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्या
आणि मोदी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून हसले, गप्पाही रंगल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 3:56 PM

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज पुणे (pune) दौऱ्यावर होते. पंतप्रधानांनी पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा कंदिल दाखवला. मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचंही भूमीपूजन केलं. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी मंचावर सत्ताधारी आणि विरोधकही उपस्थित होते. स्टेजवर मोदींच्या एका बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) बसले होते. मोदींनी स्टेजवर उभं राहून हात जोडून पुणेकरांना अभिवादन केलं. त्यानंतर ते आसनाकडे वळले. यावेळी त्यांनी आठवलेंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूसही केली. ही विचारपूस सुरू असतानाच दोन्ही नेते हास्यविनोदातही रमले. मोदी आणि आठवले यांचा गप्पागोष्टी आणि हास्य विनोदात रमतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेजवर आल्यावर त्यांच्या खास स्टाईलमध्ये डावा हात उंचावून लोकांना अभिवादन. त्यानंतर त्यांच्या शेजारीच बसलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी आठवलेंनी मोदींना बसण्याची विनंती केली. त्यानंतर मोदींनी आठवलेंशी गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली. त्यावर आठवलेंनी त्यांना काही तरी सांगितलं. त्यावर मोदी दिलखुलास हसले. मोदी हसल्यावर आठवलेंनाही हसू आवरेनासे झाले. पुन्हा मोदींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. नंतर मोदींनी दुसरीकडे मान वळवली. इतक्यात राज्यपाल आले. तेव्हा मोदींनी त्यांना बसायला सांगितलं. त्यानंतर अचानक गर्दीतून मोदी… मोदी… मोदीचा जयघोष सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे मोदींनी पुन्हा एकदा हात जोडून पुणेकरांना अभिवादन केलं.

मराठीतून सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. त्यावेळी पुणेकरांनी टाळ्या वाजवून आणि मोदी मोदींचा गजर करत जोरदार स्वागत केलं. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं आहे. टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपालकृष्ण देशमुख, भांडारकर आणि रानडेंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Modi In Pune Live : महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक विधाने, अजितदादांची मोदींकडे जाहीर तक्रार; राज्यपालांवर निशाणा?

Modi in Pune : ‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’, देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.