वाद कशाला, मोदींनी आधीच ‘त्या’ स्किमने 20 टन सोनं गोळा केलंय : पृथ्वीराज चव्हाण

धार्मिक संस्थांकडून सोने कर्जाने घेणे हे काही नवीन नाही, यापूर्वीही अशाप्रकारे सोने घेण्यातं आलं होतं, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

वाद कशाला, मोदींनी आधीच 'त्या' स्किमने 20 टन सोनं गोळा केलंय : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 5:36 PM

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना संकटकाळात धार्मिक स्थळांचं सोनं कर्जरुपी घ्या असा सल्ला पंतप्रधान मोदींना दिल्यानंतर, भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आता भाजपला प्रत्युत्तर दिलं. “मी फक्त मंदिराचं सोनं घेण्याचा उल्लेख केला नव्हता. धार्मिक स्थळांचं सोनं घेण्याचा उल्लेख केला होता. धार्मिक स्थळ म्हणजे फक्त हिंदू धर्माची मंदिरं अशी मानसिकता झाली आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Prithviraj Chavan on PM Modi Gold Monetization Scheme)

इतकंच नाही तर धार्मिक संस्थांकडून सोने कर्जाने घेणे हे काही नवीन नाही, यापूर्वीही अशाप्रकारे सोने घेण्यातं आलं होतं, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यासाठी त्यांनी 1999 मधील वाजपेयी सरकारचा दाखला दिला.

“मी दिल्लीत संसदेत असताना 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्ब नंतर जी परिस्थिती निर्माण झालेली त्यावेळी सोनं गोळा केलं होतं. अलिकडेच 2015 साली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणून एक योजना आणलेली आहे. अजूनही ती योजना सुरु आहे. या योजनेमार्फत साडे 20 टन सोनं गोळा झालेलं आहे. मग मी सल्ला दिला म्हणून त्यामध्ये एवढा गदारोळ करण्याचं काय कारण आहे?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

“माझं ट्विट स्पष्ट आहे. पण भाजपला गदारोळच करायचा आहे. एक गोष्ट चांगली झाली, आपल्या देशामध्ये हिंदू-मुस्लीम चर्चांच्या पलीकडे चर्चा होऊ लागली. हिंदू धर्मातीलच पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात चर्चा झाली. यामध्ये एक विवेकवादी तर दुसरे रुढीवादी आहेत. अशाप्रकारची चर्चा झाली पाहिजे. हा देश पुढे कुठे जाणार आहे? ते या चर्चेतून निष्पन्न होतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

“देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे जवळपास 76 लाख कोटी रुपयांचं सोनं आहे (Prithviraj Chavan suggest to Central Government). हे सोनं केंद्र सरकारने 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना दिला होता.

त्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारला अधिकच्या नोटा छापाव्या लागतील, असं मत व्यक्त केलं होतं.

गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम काय आहे?

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही मोदी सरकारने 2015 मध्ये आणली होती. ही योजना म्हणजे 1999 मधील योजनेचा सुधारित भाग आहे. या अंतर्गत घरगुती सोन्यापासून विविध संस्थांचं सोनं बँकेत ठेऊन त्यावर मुदतीनुसार व्याज देणे. जसे बँकेत पैसे ठेवल्यावर व्याज मिळतात, तसं घरात असलेलं सोनं बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळते. केंद्र सरकारची ही योजना आहे.

(Prithviraj Chavan on PM Modi Gold Monetization Scheme) संबंधित बातम्या  

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण 

आमचं सरकार प्रभावी, मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, सल्ला दिला : पृथ्वीराज चव्हाण

आधी नोटा छापण्याचा, आता देवस्थानातील सोने ताब्यात घेण्याचा सल्ला, पृथ्वीराज चव्हाणांच्या केंद्राला सूचना 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.