पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, महाराष्ट्रात राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचं BMC आयुक्तांना पत्र
येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय (Maharashtra politics) वातावरण चांगलंच तापलं आहे. मुद्दा आहे, मुंबईतल्या विकास कामांच्या श्रेयवादाचा. युवासेना नेता आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात एक खरमरीत पत्र लिहिलंय. त्यात मुंबईतल्या विकासकामांसंदर्भात अनेक प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आलेत.
आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाला गती मिळाली होती. इस्रायलचे तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प मुंबईत उभारला जातोय.
I’ve written to @mybmc MC Chahal ji with regards to Mumbai’s STP and Desalination projects seeking an update on the same. Since the betrayal & change in Govt, we haven’t heard much on it, start delayed by 6 months. We were working on reducing monsoon dependency of Mumbai pic.twitter.com/m7yBH2CYCn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 11, 2023
सीवेज ट्रीटमेंट प्लांटसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या असतानाही याचे भूमीपूजन आतापर्यंत का झाले नाही? कुणाच्या प्रतीक्षेत एवढा सहा महिन्यांचा काळ वाया घालवला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.
पंतप्रधानांसाठी भूमीपूजन रखडवलं?
खाऱ्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्याच्या रुपात करण्याच्या प्रकल्पावरूनही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उभा केला. आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून तक्रार करण्यात आली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीक्षेसाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला विलंब केला गेला.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात काय काय?
येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात मेट्रो २-ए आणि मेट्रो ७ चे उद्घाटनदेखील करतील. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी झाले आहे. दोन्ही मार्गावर २० किलोमीटरपर्यंत मेट्रोची ये-जा सुरु आहे. आता दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाईल. मोदी यांच्या हातून आणखी एक मोठं उद्घाटन होणार आहे. मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण. यासह बाळासाहेब ठाकरे आपका दवाखाना योजनेअंतर्गत ५२ दवाखान्यांचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते केलं जाईल.