Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात...
Follow us
| Updated on: Jan 12, 2020 | 11:01 PM

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत (PM Narendra Modi West Bengal Tour). या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी पश्चिम बंगालमधील भष्ट्राटचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 स्थापना दिनी मोदी म्हणाले, ममता दीदी केंद्राच्या योजनांना लागू करत नाहीत, कारण या योजनांमध्ये त्यांना नाही कट मिळत, नाही सिंडिंकेट काम करत (PM Narendra Modi On Mamata Banerjee).

“ममता सरकारने आयुष्मान भारत आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना लागू केल्या नाही. मला माहित नाही या योजनांना राज्य सरकार परवानगी देणार की नाही. मात्र, जर ममता सरकारने या योजना लागू केल्या तर लोकांना आरोग्य योजनांशी संबंधित लाभ मिळू शकतील. आम्ही या खासकरुन गरीब, दलित, वंचित, शोषित आणि मागासलेल्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. परंतु बंगालला त्याचा लाभ मिळत नाही, कारण इथल्या सरकारला हे नको आहे.

“आयुष्मान योजनेअंतर्गत 75 लाख लोकांनी लाभ घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील 90 लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. यातही 35 लाखाहून अधिक भगिनी आदिवासी आणि दलित आहेत”, असंही मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता पोर्टचं नाव बदलून श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट करत असल्याचीही घोषणा केली. “कोलकाताचं हे पोर्ट औद्योगिक, अध्यात्मिक आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे. हे पोर्ट आता 150 व्या वर्षात प्रवेश करत आहे, या निमित्ताने याला नवीन भारताच प्रतीक बनवणे गरजेचं आहे. आजच्या या प्रसंगी मी बाबासाहेब आंबेडकरांनाही स्मरण करतो, त्यांना नमन करतो”, असं मोदी म्हणाले.

केंद्राच्या योजनामध्ये नाही मध्यस्थ, नाही सिंडिकेट

ममता बॅनर्जींवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 43,000 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. कोणी मध्यस्थ नाही, सिडिंकेट नाही आणि जेव्हा थेट मदत मिळते तेव्हा कट मिळत नाही, सिंडिकेट चालत नाही, मग अशा योजना का लागू करणार. देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना इतकी मोठी मदत, पण बंगालच्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही याचं मला नेहमी दु:ख असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की धोरण निर्मात्यांनाना देव सद्बुद्धी देवो आणि आजारीपणात गरिबांची मदत करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आणि शेतकऱ्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी शेतकरी सम्मान योजनेचा मार्ग मोकळा व्हावा. त्यांना याचा लाभ मिळावा. ”

PM Narendra Modi On Mamata Banerjee

पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.