Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण, राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेंना पोलिसांची नोटीस

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यापूर्वी एका पोस्टरवरुन वाद निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांना नोटीस बजावली आहे.

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण, राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेंना पोलिसांची नोटीस
नरेंद्र मोदी Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:09 AM

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. देहूतील संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात येतेय. त्याचबरोबर मुंबईतील जलभूषण इमारत आणि राजभवनातील क्रांतीकारक गॅलरीचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी ते बीकेसीतील मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यापूर्वी एका पोस्टरवरुन वाद निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांना नोटीस बजावली आहे.

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेंना पोलिसांची नोटीस

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. एका बॅनरवर पंतप्रधान मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षाही मोठा छापला गेलाय. या बॅनरवरुन भाजपने एकप्रकारे जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केलीय. तसंच वारकरी संप्रदायाची भाजपने जाहीरपणे माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर रविकांत वरपे यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वरपेंना 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.

प्रशासनाची खबरदारी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आलीय. देशात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. अशावेळी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यातच देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 500 वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. तसंच मोदींच्या स्वागतासाठी असणारे 400 टाळकरी, तसंच मोदींच्या संपर्कात येणाऱ्या 100 वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून देहू मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.