Sonia Gandhi : दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा, दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करणं, काँग्रेस मुख्यालयासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविणं, यातून हिटलरशाहीचं दर्शन होतंय.

Sonia Gandhi : दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा, दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप
दिल्लीतील सोनिया गांधींच्या घरासमोर पोलिसांचा पहारा
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:59 PM

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं आज यंग इंडिया लिमिटेडचे कार्यालय सील (Office Seal) केले. हे कार्यालय हेराल्ड हाऊसच्या परिसरातच आहे. ईडीच्या या कारवाईनंतर काँग्रेस मुख्यालयात खळबळ माजली. काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस मुख्यालयात पोहचत आहेत. याशिवाय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यंग इडिया लिमिटेडचं कार्यालय सील झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयराम रमेश (Jairam Ramesh), अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयासोबतच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

महागाईविरोधातील प्रदर्शनाला परवानगी नाकारली

जयराम रमेश यांनी सांगितलं, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलानं काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर घेराव घातला. अजय माकन म्हणाले, पा ऑगस्टला काँग्रेस महागाईविरोधात राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करणार होती. याची घोषणा शनिवारी करण्यात आली. परंतु, डीसीपींनी प्रदर्शन करण्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय आणि राहुल-सोनिया यांच्या घराला घेराव घालण्यात आला.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसला दहशतवाद्यांसारखी वागणूक

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, केंद्र सरकारला भीती वाटते की महागाईविरोधात लोकं एकत्र येतील. त्यामुळं भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. देशातील सर्वात जुन्या पक्षाला दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे.

पोलिसांना घाबरणार नाही

पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलंय. सत्याची आवाज दाबला जाऊ शकत नाही. गांधींचे कार्यकर्ते ही लढाई जिंकतील. नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करणं, काँग्रेस मुख्यालयासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविणं, यातून हिटलरशाहीचं दर्शन होतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.