भुजबळांच्या फार्म बाहेरील पोलिस गायब, सुरक्षेचे तीन तेरा?
मंत्री छगण भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे काल त्यांनी सभागृहात सांगितले. त्यांनंतर आज अचानक त्यांच्या बंगल्याबाहेरील पोलिस बंदोबस्त कढण्यात आला. यामुळे भुजबळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक : मराठा आणि ओबीसी वाद चांगलाच चिघळत चालला असल्याचे चित्र आहे. मला जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचे खुद्द अजित पवार गटाचे नेते छगण भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी काल स्वतः सभागृहात सांगितले. घराबाहेर अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने भुजबळांनी पोलिसांना नेमके प्रकरण काय अशी विचारणा केली. त्याववर वरून इनपूट आले आहे. भुजबळांना गोळी मारली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली असं भुजबळ म्हणाले. मात्र आता भुजबळांच्या फार्म बाहेरील सगळे पोलिस गायब असल्याने त्यांच्या सुरक्षेचे तीन तेरा झालेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
या आधीसुद्धा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे छगण भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावरून कायमच शाब्दिक युद्ध सुरू पाहायला मिळते. भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असं मनोज जरांगे म्हणतात तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका छगण भूजबळ यांची आहे. यामुळे दोघांमध्येही टोकाच्या टिका टिपण्या होत असतात.
छगण भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी या आधीही आली असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र काल अचानक सुरक्षा वाढवल्यानंतर आज त्यांच्या फार्मबाहेर एकही पोलिस नसल्याने सुरक्षेसंबंधी मोठा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे. तर दुसरीकडे एकट्या भुजबळांना कोणी कशाला धमकी देईल असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणावरून मला जाणिवपूर्वक टार्गेट केल्या जात असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही फक्त ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये इतकचं माझं म्हणणं असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांच्याकडून भुजबळांवर एकेरी भाषेत टिका केली जाते. भुजबळांकडूनही तशाच प्रकारची प्रतिक्रीया दिली जाते. या प्राकारामुळे दोघांचेही समर्थक आक्रमक होत असल्याचे पहायला मिळत आहे.