शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन संशयास्पद; पोलिसांनी चौकशी करावी, नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले आहेत. एसटीच्या विलिनिकरणात शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अडथळला आणल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन (ST workers’ agitation) करण्यात आले. मात्र या आंदोलनाला (agitation) हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. आंदोलकांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच चप्पल आणि दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान आता या आंदोलनावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
‘पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आजचे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांना कदाचीत इतिहास माहित नसावा. शरद पवार यांनी कामगाराच्या कल्याणासाठी आपली हयात घालवली. आज त्यांच्या घरावर जे आंदोलन झाले ते संशयास्पद आहे. एकीकडे आझाज मैदानात जल्लोष करण्यात आला, मग दुसरीकडे शरद पवार यांच्या घरासमोर आचानक आंदोलन कसे करण्यात आले? हा तर लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचा प्रकार झाल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी तपास करावा
पुढे बोलताना धनंजय मु़ंडे यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांना जे काही मिळालं ते पवार साहेबांच्या मध्यस्थीमुळे मिळालं. हे षडयंत्र आहे. याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. पवार साहेब आमचं दैवत आहेत. देशाच्या राज्याच्या माणसासाठी त्यांनी आयुष्य वाहिलंय. संपूर्ण राज्याची शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न कुणाकडून सुरु आहे, याचा तपास झाला पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले