ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे आज (27 डिसेंबर) निधन (Cartoonist Vikas Sabnis pass away) झाले आहे.
मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे आज (27 डिसेंबर) निधन (Cartoonist Vikas Sabnis pass away) झाले आहे. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झाले आहे. त्यासोबतच अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त (Cartoonist Vikas Sabnis pass away) केलं आहे.
विकास सबनीस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. याच दरम्यान त्यांना आज ह्रदयविकाराच झटका येऊन त्यांचे निधन झाले.
सबनीस यांच्या पार्थिवावर शनिवारी (28 डिसेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तसेच राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सबनीस यांची गेल्या 50 वर्षाची व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्द आहे. त्यांच्यावर आर. के. लक्ष्मण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. त्यांचे व्यंगचित्र पाहून सबनीस यांनी राजकीय व्यंगचित्र काढण्याची सुरुवात केली.