नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात
राज्यात अशी लक्ष्यवेधी घराणी आहेत, जे एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांची लढत राज्याला माहीत आहेच, पण अन्य भावंडे, भावकी, नातीगोती रिंगणात आहेत.
मुंबई : यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण मागच्यावेळी ज्या पक्षातून निवडून आले ते आता त्याच पक्षात असतील असं नाही. अनेकांनी पक्ष बदलला आहे. अनेक युवक निवडणूक लढवत आहे. तसंच नात्यागोत्यातही निवडणूक रंगली आहे. राज्यात अशी लक्ष्यवेधी घराणी आहेत, जे एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांची लढत राज्याला माहीत आहेच, पण अन्य भावंडे, भावकी, नातीगोती रिंगणात आहेत.
नातेवाईक vs नातेवाईक
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) vs अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) – निलंगा, लातूर (चुलते पुतणे)
जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) – माण, सातारा (सख्खे भाऊ)
पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – परळी, बीड (चुलत भाऊ)
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) – बीड, बीड (चुलते-पुतणे)
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) vs निलय नाईक (भाजप) – पुसद, यवतमाळ (चुलत भाऊ)
संबंधित बातम्या
विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!