मोदींच्या सभेनंतर सोलापुरात राजकीय हादरा, प्रणिती शिंदेंची जागा धोक्यात
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरात येऊन 30 हजार घरांचं भूमीपूजन केलं. सोलापुरातून लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. या सभेमुळे महाराष्ट्रातील नेत्यांसह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. मात्र मोदींच्या जाहीर सभेने काँग्रेसने तयार केलेल्या वातावरणाला खो बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्यात मोदी लाटेत सुद्धा विजय मिळवणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातल्या अडचणी वाढल्या […]
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरात येऊन 30 हजार घरांचं भूमीपूजन केलं. सोलापुरातून लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. या सभेमुळे महाराष्ट्रातील नेत्यांसह भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. मात्र मोदींच्या जाहीर सभेने काँग्रेसने तयार केलेल्या वातावरणाला खो बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्यात मोदी लाटेत सुद्धा विजय मिळवणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातल्या अडचणी वाढल्या आहेत.
सोलापुरात मोदींना ऐकण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. ‘मोदी, मोदी’चा नारा लावला जात होता. मराठीत सुरुवात, हिंदीत भाषण आणि कन्नडमध्ये सभेचा समारोप करत मोदींनी सर्वांची मनं जिंकली. मोदींच्या या सभेने सोलापूर शहराच्या राजकीय वर्तुळात मात्र जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे. 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करुन भाजपने सोलापूर जिल्ह्यात मुसंडी मारली. त्यानंतर आता मोदींच्या 2019 च्या सभेने विधानसभेचं गणितही बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विळा-भोपळ्याप्रमाणे राजकीय आणि सामाजिक वैर असलेल्या भाजपने माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचं कौतुक करत बळ दिलं. सोलापूर शहर मध्य मधील काँग्रेस आमदार आणि सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत. वाचा – सुरुवात मराठीत, भाषण हिंदीत, शेवट कन्नड, मोदींच्या भाषणाने नेते अवाक्
सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे आणि या कामगारावर राजकीय नेत्यांचं भवित्यव अवलंबून आहे. त्यामुळे कामगारांची मते ही निर्णायक ठरतात. माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या रेनगर फेडरेशच्या 30 हजार घरांच्या भूमीपूजनाने मोदींच्या 2019 च्या प्रचाराला पूरक अशी संधी दिली. त्यातूनच भाजपने प्रणिती शिंदेंचा मतदारसंघ माकपच्या माध्यमातून पुन्हा खिळखिळा करण्याचा चंग बांधलाय.
यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात नरसय्या आडम यांनी दहा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण केलाय. आता भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांनी 30 हजार घरांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. मात्र यातूनच त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच कम्युनिस्ट आणि भाजपात विस्तव आडवं जात नसलं तरीही तत्त्व बाजूला ठेवून डाव्या विचार सरणीच्या नरसय्या आडम यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं महाराष्ट्राने पाहिलं. वाचा – ‘ही’ घोषणा करताच सोलापुरात ‘मोदी, मोदी’च्या घोषणा
विरोधक काही करत असले तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वावर मतदार मोठा विश्वास टाकत असून, पुन्हा एकदा राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. एकीकडे माकपच्या नरसय्या आडम यांना बळ देत असताना दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना सभेच्या आयोजनापासून दूर ठेवत लोकसभा उमेदवार बदलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मोदींच्या जाहीर सभेनंतर आता राजकीय खलबत्ते घडू लागले आहेत.