LIVE दिवसभरातील राजकीय घडामोडी लाईव्ह
[svt-event title=”काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेसकडून विविध राज्यातील 27 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही [/svt-event] [svt-event title=”लोकसभेसाठी एमआयएम मैदानात, औरंगाबादेत महत्त्वाची बैठक सुरु” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत एमआयएम नगरसेवकांची बैठक सुरू, महानगरपालिकेतील एमआयएमचे झाडून सर्वच नगरसेवक बैठकीला उपस्थित, अब्बास फंक्शन हॉलमध्ये बैठक सुरू, दोन दिवसांपूर्वी […]
[svt-event title=”काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] काँग्रेसकडून विविध राज्यातील 27 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही [/svt-event]
[svt-event title=”लोकसभेसाठी एमआयएम मैदानात, औरंगाबादेत महत्त्वाची बैठक सुरु” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत एमआयएम नगरसेवकांची बैठक सुरू, महानगरपालिकेतील एमआयएमचे झाडून सर्वच नगरसेवक बैठकीला उपस्थित, अब्बास फंक्शन हॉलमध्ये बैठक सुरू, दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद लोकसभा लढवण्याची दाखवली होती तयारी, या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्यामुळे बैठकीला महत्व, लोकसभा लढवण्याची एमआयएम नगरसेवकांची आग्रही मागणी [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसही राजू शेट्टींना 1 जागा देणार- भुजबळ” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] स्वाभिमानीला काँग्रेस 1 जागा निश्चित देणार, पवारसाहेब स्वतः हा प्रयत्न करत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारचं धोरण शेतकरीविरोधी आहे. सन्मान योजना ही अपमान योजना आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव यावर आमचं एकमत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी राजू शेट्टींच्या भेटीनंतर दिली. [/svt-event]
[svt-event title=”आम्ही आघाडीसोबत – राजू शेट्टी” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी स्वाभिमानी आघाडीसोबत,आम्ही एकत्रित भाजपला पराभूत करणार. संपूर्ण कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभाव हा कॉमन अजेंडा,आघाडीत यावर एकमत, आमची 3 जागांची मागणी होती, राष्ट्रवादीनं हातकणंगले सोडली, काँग्रेस,वर्धा किंवा सांगली यातील एक जागा स्वाभिमानीला देणार, अशी माहिती राजू शेट्टी यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर दिली. [/svt-event]
[svt-event title=”गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] गोव्यात काँग्रेसकडून सरकार स्थापनेचा दावा, राज्यपालांना पत्र, भाजपने संख्याबळ गमावल्याचा आरोप [/svt-event]
[svt-event title=”न्यूजरुम स्ट्राईक” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ]
न्यूजरुम स्ट्राईकमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 8 वा. @TV9Marathi वर @prithvrj @INCMaharashtra pic.twitter.com/feHAA2dnPF
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजपच्या बैठकीला मोदींची हजेरी” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ]
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at BJP headquarters for the party’s Central Election Committee (CEC) meeting; received by BJP President Amit Shah pic.twitter.com/xn7rk5GGgR
— ANI (@ANI) March 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”थोड्याच वेळात भाजपच्या 100 पेक्षा जास्त उमेदवारांची नावं जाहीर होणार” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीला सुरुवात, मोदींचीही बैठकीला उपस्थिती, केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांसह विविध राज्यांमधील प्रमुख नेते नावांवर शिक्कामोर्तब करणार [/svt-event]
[svt-event title=”राजू शेट्टी-भुजबळ भेट” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] नाशिक – राजू शेट्टी छगन भुजबळ यांच्या भेटीला, नाशिकच्या भुजबळ फार्मवर दोघांत चर्चा सुरु, दोघात नेमकी काय चर्चा होते याची उत्सुकता [/svt-event]
[svt-event title=”मनसेचा 19 मार्चला मेळावा” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] मनसेची राजकीय भूमिका 19 मार्च रोजी जाहीर होणार, महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार, मुंबईतील रंगशारदा सभागृह इथे पक्षाचा मेळावा [/svt-event]
[svt-event title=”खोतकरांबाबत उद्या निर्णय” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, पक्षप्रमुखांकडे मी माझे प्रस्ताव ठेवले, उद्धव ठाकरेंनी माझे पूर्णपणे ऐकून घेतले. मला खूप वेळ दिला. जालना लोकसभा निवडणुकीसंदर्भात उद्या निर्णय होईल- अर्जुन खोतकर यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबादेत राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ]
उस्मानाबाद बालेकिल्ला, तरीही राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात का?https://t.co/8IR5xhfwH5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नाना पटोलेंचं उत्तर” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] प्रकाश आंबेडकर ज्यांना डमी उमेदवार म्हणतात, ते उमेदवार निवडून येतात. भंडारा – गोंदिया पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे डमी उमेदवार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणायचे, पण ते निवडून आले – नाना पटोलेंचं आंबेडकरांना उत्तर [/svt-event]
[svt-event date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] सोलापूर — भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी सैनिकांची उपमा, पुलवामा हल्ल्यात ज्याप्रमाणे सैनिकांनी हल्ला करून शत्रूला धडा दिला, त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते राजकीय आतंकवाद्याना धडा शिकवतील [/svt-event]
[svt-event title=”अर्जुन खोतकर ‘मातोश्री’वर” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते अर्जुन खोतकर जालन्यातून लढण्यावर अजूनही ठाम, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी खोतकर ‘मातोश्री’वर, खोतकरांचा तिढा आज सुटण्याची चिन्हं [/svt-event]
[svt-event title=”मेटेंचा पंकजांना विरोध” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] बीड: शिवसंग्राम पंकजा मुंडेंसोबत काम करणार नाही, कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे विनायक मेटे यांचा निर्णय, राज्यात भाजपसोबतच राहणार, पंकजांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप [/svt-event]
[svt-event title=”ग्राम परिवर्तकारावर अॅसिड हल्ला” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] गडचिरोली: मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकारावर अॅसिड हल्ला, ग्राम परिवर्तकार समाधान कस्तुरे हल्ल्यात गंभीर जखमी, कस्तुरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्राम पंचायतीचे कस्तुरे ग्राम परिवर्तकार, अज्ञात लोकांनी कस्तुरे यांच्या खोलीचा दरवाजा फोडून झोपेत असताना अॅसिड हल्ला केला. संतोष कस्तुरेवर नागपुरात उपचार सुरु, संतोष कस्तुरे सोलापूरचे रहिवाशी असल्याची माहिती. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत करण्यात येते ग्राम परिवर्तनकाराची नियुक्ती [/svt-event]
[svt-event title=”कोळसे पाटलांना उमेदवारी नाही?” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ही भावना मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय होईल. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे चांगले जस्टीस आहेत, विधीज्ञ आहेत, पण त्यांना औरंगाबादेत कुणी ओळखत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्यांचं काम करतील असं वाटत नाही. मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पण याबाबत मला मुंबईच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता पण मी त्यांना नकार कळवला. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी दोनच दिवसात औरंगाबाद लोकसभेबाबत निर्णय घेतील. जवळपास निर्णय होत आलाय दोन दिवसात याबाबत सगळं काही स्पष्ट होईल, अशी माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”भाजपची महत्त्वाची बैठक” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] भारतीय जनता पक्षाची संसदीय समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत लोकसभा उमेदवार यादीवर शिकामोर्तब होणार आहे.100 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही नावांचा समावेश असण्याचे संकेत. [/svt-event]
[svt-event title=”काटोल पोटनिवडणुकीला विरोध” date=”16/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर: काटोल विधानसभा पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात धाव, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काटोलच्या पोटनिवडणुकीला आव्हान, काटोल विधानसभा क्षेत्रात भीषण दुष्काळ आहे, शिवाय सरकारी निधी व्यर्थ घालवू नये, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांची नागपूर खंडपीठात याचिका, सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता [/svt-event]