राजा डळमळीत, पण कायम राहणार; भेंडवळची राजकीय भविष्यवाणी

बुलढाणा : अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली. राजा कायम असेल, पण डळमळीत राहील अशी शक्यता घटमांडणीवर करण्यात आली. यावेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ही भविष्यवाणी केली. भविष्यवाणीत सांगण्यात आले, “यावर्षी पाऊस सर्वसामान्य असेल. चाऱ्याची टंचाई निर्माण होईल. त्याचबरोबर देशासमोर आर्थिक चणचण जाणवेल.” संरक्षण क्षेत्रावर भविष्यवाणी करताना […]

राजा डळमळीत, पण कायम राहणार; भेंडवळची राजकीय भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

बुलढाणा : अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली. राजा कायम असेल, पण डळमळीत राहील अशी शक्यता घटमांडणीवर करण्यात आली. यावेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ही भविष्यवाणी केली.

भविष्यवाणीत सांगण्यात आले, “यावर्षी पाऊस सर्वसामान्य असेल. चाऱ्याची टंचाई निर्माण होईल. त्याचबरोबर देशासमोर आर्थिक चणचण जाणवेल.” संरक्षण क्षेत्रावर भविष्यवाणी करताना घुसखोरी कायम राहील, मात्र संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल, असेही सांगण्यात आले.

एकूणच भविष्यवाणीत थेट राजकीय भाष्य करण्यास पुंजाजी महाराजांनी नकार दिला. मात्र, देशाच्या पंतप्रधानांबाबत त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. राजा कायम असेल, पण डळमळीत राहील, अशी राजकीय भविष्यवाणी त्यांनी घटमांडणीवर केली. पुंजाजी महाराजांच्यावतीने शारंगधर महाराजांनी त्यांच्या भविष्यवाणीची घोषणा केली.

शेतीविषयक भविष्यवाणी

“यावर्षी ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. तुरीचे पीक चांगले येईल. मुग, उडीद, तीळ, तांदुळ, जवस ही पीकं सर्वसाधारण येतील. मात्र, पिकपाण्यावर रोगराई पडेल. पाऊस जून महिन्यात साधारणच राहिल. तसेच पेरणी सर्व ठिकाणी होऊ शकणार नाही. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी-जास्त होईल. सप्टेंबर महिन्यात लहरी स्वरुपाचा पाऊस पडेल. चारा पाण्याची टंचाई देखील संपून जाईल.”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.